कट्टा एप्रिल २०२१

 

विनय थत्ते 

संपादकीय

संपूर्ण देशांत उन्हाचा ताप असह्य व्हायला लागलाय आणि काही राज्यांत कोरोनाबाधितांची संख्याही वाढत चालली आहे. अशा सतत तणावाच्या काळात वाचन, संगीत यासारखे काही छंद मनाला उभारी देऊ शकतात.

 

ह्या काळात पर्यटन करणे अशक्यच आहे. पण तरीही 'कट्टा'च्या माध्यमातून आम्ही आपणाला टांझानियातील किलिमांजारोची सफर घडवून आणणार आहोत. आमच्या फोटो फिचरमध्ये आणि मुखपृष्ठावर पहा आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आणि ते शिखर सर करताना काढलेले विविध फोटो.

 

१० एप्रिलला जागतिक होमिओपॅथी दिवस असतो त्यानिमित्ताने ह्या उपचार पद्धतीवर एक विस्तृत लेख सादर करीत आहोत. प्रत्येकालाच आपले मूल हुशार असावे असे वाटते. पण कधी कधी असामान्य बुद्ध्यांक असलेली माणसेही सुखी, आनंदी जीवन जगू शकत नाहीत. कशामुळे ते जाणून घ्या 'विल्यम जेम्स सीडिस'वरील लेखातून.

 

मानसिक आजार पूर्वी होते का हो? कारण त्या काळात मानसोपचार तज्ञ होते असे फारसे ऐकिवात नाही. मग काय करायचे लोक त्या काळी? वाचा 'पारंपारिक मानसोपचार' ह्या लेखात. त्याचप्रमाणे फेब्रुवारी आणि मार्च ह्या महिन्यात मित्रमंडळ बंगळुरूने सादर केलेल्या दोन कार्यक्रमांचे अहवाल देत आहोत. कमी शब्दातून खूप काही सांगणारी मानस कथा वाचायला विसरू नका.

 

ह्या महिन्यातल्या कविता तुम्हांला नक्की आवडतील. स्वतःशीच केलेला संवादही कसा अनेकांच्या भावनांना स्पर्शून जातो हे जाणवेल त्यातून. याशिवाय आपल्या नेहमीच्या लेखमाला आहेतच. आणि शब्दकोडे सोडवताय ना? स्मृतीभ्रंशाला दूर ठेवण्याचा हा खात्रीचा उपाय आहे म्हणे. चला तर मग. ठरल्याप्रमाणे आम्ही आपल्या भेटीला आलोच आहोत. तुमचेही मत, सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. कट्टा आवडला ना हे कळवा. कट्टा टीम तर्फे सर्वांना होळीच्या आणि धुळवडीच्या शुभेच्छा

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.


स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा


No comments:

Post a Comment