फोटो- मनीष जगताप |
संपादकीय
कट्ट्याच्या सर्व वाचकांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
लता मंगेशकर यांना मार्च महिन्यातील कट्टा मधून दिलेली भावांजली आवडल्याचे आम्हांला अनेकांनी आवर्जून सांगितले. आता एप्रिल मध्ये कट्टा परत आपल्या नेहमीच्या रुपात तुमच्या भेटीला येत आहे. ह्या कट्टात झुंड आणि The Kashmir Files ह्या दोन सिनेमांची परीक्षणे देत आहोत. परीक्षणे म्हणण्यापेक्षा खरे तर हे सिनेमें पाहून मनात आलेल्या विचारांची ही वर्तुळे आहेत. मनात उठलेले हे तरंग आहेत. कोणत्याही कलाकृतीचे हेच तर उद्दिष्ट असते, आणि कट्टा हे अशा मुक्त चिंतनासाठीचे व्यासपीठ आहे.
त्याशिवाय वाचा कोपेनहेगन डायरीचा तिसरा भाग. Vitamin C तुम्हांला देखील नक्की उर्जा देईल. ध्यासपर्व ह्या सिनेमावरील लेख जरूर वाचा. काळाच्या पुढे विचार करणे म्हणजे काय हे जाणून घ्या. भीमबेटका ह्या जागेबद्दल माहिती वाचा डोळस भटकंती मध्ये. अवकाश वसाहतीबद्दल वाचा आकाशझेप मध्ये. वाचा हिंदी साहित्य विश्वातील कृष्णा सोबती या उत्तुंग प्रतिभेच्या लेखिकेविषयी. भाषेतील गोडवा टिकवणाऱ्या म्हणींबद्दल जीवनस्पर्शी मध्ये एक चिंतन.
याशिवाय शब्दकोडे, फोटो फिचर आहेच. कट्टा तुमच्या पसंतीला उतरला की नाही ते जरूर कळवा.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर.
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
No comments:
Post a Comment