कट्टा-एप्रिल २०२०



संपादकीय

मार्च महिना आणि उन्हाळा एकदमच भेटीस येतात. हवामानात झालेला बदल जाणवायला लागतो. ह्या महिन्यात तर कोरोना मुळे अजूनच 'ताप' आहे. सरकार सर्व सामर्थ्यानिशी ह्या समस्येशी झुंज देत आहे. नागरिकही आपापल्या परीने मदत करतातच आहेत. कोरोना मुळे होळी, पाडवा हे सणही थोडेसे साध्या पद्धतीनेच साजरे झाले. पण त्याला इलाज नाही. शेवटी 'सर सलामत तो पगडी पचास' हेच खरे.

ह्या कट्ट्यात एक नागरिक ह्या नात्याने आपण भोवताली काय काय बदल करू शकतो हे सांगितले आहे 'केल्याने होत आहे रे' आणि 'माझा महिला दिन' ह्या लेखात. आठवणीतल्या गावात घेऊन जात आहेत गणेश शिंदे. 'चाळीशी'ची गोष्ट ही जरूर वाचा. वाढणारे वय आपण काही थांबवू शकत नाही. ते 'gracefully' कसे मान्य करायचे हे प्रत्येकाच्या हातात असते. अनेकदा आपण हातात असलेल्या सुखाकडे पाठ फिरवून काल्पनिक सुखाच्या मागे धावून कसे स्वतःचेच नुकसान करतो हे वाचा 'नात्यांचे रेशमी बंध' मध्ये. आणि जरूर वाचा हॅरी आणि मेगनच्या रॉयल एक्झिट बद्दल आपल्या साध्यासुध्या मैत्रिणीला काय वाटते ते. 
याशिवाय कट्टा वाचकांसाठी काही diet tips ही देत आहोत. नेहमीच्या लेखमाला भरपूर माहिती देतीलच. येणारा महिना सगळ्यांसाठीच परीक्षेचा असणार आहे. कोरोनावर यशस्वी  मात आपण सगळे करूच ह्या आशेसह इथेच थांबते.
कट्टा आपल्या मित्रपरिवारालाही जरूर पाठवा. आपल्या सूचना, आपली मते जाणून घ्यायला आवडेल. आमचा mail id आहे, 
mitramadalkatta@gmail.com

स्नेहा केतकर

लिंक क्लिक करा

No comments:

Post a Comment