कट्टा -ऑगस्ट २०२०

©सीमा ढाणके 


संपादकीय
ऑगस्ट महिन्याचा कट्टा हा साहित्य विशेषांक आहे. खरे तर, न ठरवताच हा विशेषांक जमला असे म्हणूया. काही तरुणांनी आपली साहित्याविषयीची मते आमच्याकडे लेखरुपात पाठविली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देणे गरजेचे वाटले. तरुण पिढी साहित्याकडे इतक्या सजगतेने बघत आहे हे चित्र नक्कीच आशादायक आहे.

ह्याच विषयाला अनुसरून काही साहित्यिकांची माहिती आणि पुस्तक परीक्षणेही दिली आहेत. कविता आणि 'कवितेची गोष्ट' ही दिली आहे. तुम्हांला ती नक्कीच आवडेल अशी आशा आहे. ऑगस्टमध्ये येणाऱ्या मैत्रीदिनाला 'कट्टा' कसा विसरेल? 'मैत्री' हे असे एक नाते आहे, जे आपण स्वतः जोडतो. त्याबद्दल वाचा 'मैत्र जीवांचे' मध्ये.
दुसऱ्या महायुद्धावरील लेखमाला ह्या महिन्यापासून आपला निरोप घेत आहे. ह्या युद्धाला ७५ वर्षे पूर्ण झाली आणि अनेक दूरगामी परिणाम ह्या घटनेने जगावर केले. ह्या लेखमालेने त्या सगळया आठवणींना उजाळा मिळाला. घरातून काम करताना 'घर' आणि 'काम' याचा समतोल कसा सांभाळायचा? वाचा 'समुपदेशन' मध्ये. 
सगळया मित्रपरिवाराला येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!! लोभ आहेच, तो आपल्या कॉमेंटमधून आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका ही विनंती.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 

No comments:

Post a Comment