कट्टा ऑगस्ट २०२१

 


संपादकीय

ऑगस्ट महिन्याचा कट्टा सादर करताना मनात संमिश्र भावना आहेत. आता आपणहून कट्टाशी जोडत जाणाऱ्या वाचकांची संख्या वाढते आहे. कट्टा टीम वरील वाढलेल्या जबाबदारीची ही जाणीव आनंदच देते.

ह्या कट्टा मध्ये ही वेगवेगळ्या विषयांवरील लेख देत आहोत. गीताई मध्ये वाचा १८ व्या अध्यायावरील विवेचनाचा दुसरा भाग. सध्या ड्रोन हे चर्चेत आहेत. त्याबद्दल वाचा आकाशझेप मध्ये. भावनांचे नियमन कसे करावे ते जाणून घ्या जगू या आनंदे मधून. तसेच स्वरानंद मध्ये वाचा सुरांचा जादूगार मदन मोहन बद्दल. सध्या राजकीयदृष्ट्या चर्चेत असलेल्या तिबेटचे अप्रतिम फोटो सादर करीत आहोत फोटो फिचर मध्ये. शिवाय शब्दकोडे आहेच सोबतीला.

जुलै-ऑगस्ट महिने म्हणजेच मराठीतील आषाढ आणि श्रावण. हे महिने सोबत घेऊन येतात पंढरीची वारी आणि कृष्णाष्टमी. ह्या दोन्ही लाडक्या दैवतांबद्दल वाचा सखा ह्या लेखात. तसेच कन्हैया आणि पावा ह्या कवितांमध्ये. अमेरिका प्रवास हा आता काही नवा राहिलेला नाही. तरीही आपल्या पहिल्या भेटीत अनेक गंमती जमती होतातच. त्या वाचा दिवस अमेरिकेचे मध्ये. झुळूक, इमोजी आणि सोबती वाचतानाही तुम्ही रंगून जाल याची खात्री आहे. गोंदून घे भाळावरी एक तरल कविता. तुम्हांला नक्की आवडेल अशी खात्री आहे आमची.

मित्रमंडळ कट्टा वरील लेख वाचला की त्या लेखाखालीच आपण आपला अभिप्राय नोंदवू शकता. तसे नक्की करावे ही मनापासून विनंती. आमच्या लेखकांनाही त्यामुळे वाचकांशी संवाद झाल्याचा आनंद मिळतो. लोभ आहेच तो वाढेल ही खात्री आहे.

आपल्या मित्रपरिवारालाही कट्टा पाठवा आणि आपल्या सर्वांचा प्रतिसाद जरूर कळवा.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर

                                                     


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा




No comments:

Post a Comment