कट्टा डिसेंबर २०२०

विनय थत्ते 

 

संपादकीय

दसरा-दिवाळी साजरी करून पुन्हा एकदा आपल्या भेटीसाठी हा डिसेंबरचा कट्टा येत आहे. खरोखरच दर जानेवारीत आपण उत्साहात असतो. येणाऱ्या वर्षी काय काय करायचे याचे बेत आखतो. गेले संपूर्ण वर्ष मात्र कोरोनाच्या छायेत गेले. तरीही ह्या सणाच्या निमित्ताने सगळया घरात आनंदाची उधळण झालीच असेल याची खात्री आहे.

ह्या कट्ट्यात पहिलीच कथा हिंदी भाषेतील आहे. आपल्याला काही हिंदी भाषा वाचायला अडचण येत नाही म्हणूनच ही 'अनोख्या गृहप्रवेशाची' कथा देत आहोत. सुखाचा मूलमंत्र हा लेख जरूर वाचा. आपले सुख कसे आपल्याच हातात, वागण्यात आहे हे जाणवेल.

'परतीचा फराळ' ह्या शीर्षकाखाली दिवाळी ह्या विषयावरील थोडे उशिरा आलेले लेख-कविता देत आहोत. आपल्याला ते आवडतील अशी आशा आहे.

मित्रमंडळाने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात दोन ऑन लाईन कार्यक्रम केले. त्याचा खास अहवाल आपल्यासाठी देत आहोत. चुकवू नयेत अशा ह्या मुलाखती आहेत. अहवाल ही वाचा आणि सोबत दिलेल्या लिंक वरून मुलाखतीही जरूर पहा.

सोबत आपली नेहमीची सदरे आहेतच. स्वरानंद मध्ये वाचा वसंत देसाई ह्या गुणी संगीतकाराबद्दल. गीताईत वाचा विश्वरूपदर्शनाबद्दल. आकाशझेप मध्ये वाचा पहिल्या यशस्वी उड्डाणाबद्दल आणि जीवन कौशल्यात वाचा Empathy म्हणजे काय ह्या बद्दल.

फोटो फिचर जरूर पहा. त्यात देत आहोत खास करून अमेरिका आणि कॅनडा येथे प्रसिद्ध असलेल्या रंगाची मुक्त उधळण असलेल्या Fall ऋतूचे फोटो. पुढे येणारे निष्पर्ण दिवस, अतीव थंडी सहन करण्याची शक्तीच जणू काही ही मनभावन रंगांची पाने देऊन जातात. 

आपल्याला कट्टा कसा वाटला ते कळवायला मात्र विसरू नका.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर





अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 


No comments:

Post a Comment