कट्टा डिसेंबर २०२१

 

सुषमा पुराणिक

संपादकीय 

कट्टाच्या सर्व वाचकांची या वर्षीची दिवाळी नक्कीच आनंदात पार पडली असेल अशी खात्री आहे. कोरोनाचे सावट आता हळूहळू दूर होत आहे. त्यामुळे अनेकजण प्रवासालाही जाऊ शकले असतील. असो. डिसेंबरचा हा कट्टा अंकही भरगच्च भरलेल्या दिवाळीच्या फराळाच्या ताटासारखा आहे.  

यावर्षी उत्साहात निघालेल्या दिवाळी अंकांचा, त्यातील साहित्याचा एक आढावा घेऊया कट्टातील 'दिवाळी अंक २०२१ - काय वाचाल?' या लेखात. मॅारिशसच्या सहल वर्णनाचा दुसरा भाग देत आहोत. कोरोना काळातील ही virtual tour सगळ्यांना नक्कीच आवडेल. 'शिळा फराळ' मध्ये वाचा कधीही 'शिळ्या' न होणाऱ्या दिवाळीच्या आठवणी. 'मुरताना ....' या तरल लेखात वाचा जीवनात विरघळून जात, जगण्याचा आस्वाद कसा घ्यायचा ते! तसेच रोज दिसणाऱ्या चंद्राला भेटा 'चंद्र आहे साक्षीला' मध्ये. मानसशास्त्र, दीपमाळेवरील रंजक माहिती, शिवाय अंतर्मुख करणाऱ्या कविता साथीला आहेतच.

आवडलेले पुस्तक आणि गाणे दर वेळी ऐकताना नवी अनुभूती देऊन जाते. कशी ते वाचा 'उत्खनन' आणि 'अजून अंतरात...' या लेखात. 'आकाशझेप' मध्ये ह्यावेळी वाचूया हवाई जहाजांबद्दल. मुक्तिबोध ह्या मराठी असलेल्या पण हिंदीत मुबलक साहित्यलेखन केलेल्या आणि हिंदी साहित्यविश्वाला नवा विचार देणाऱ्या लेखकासंबंधी जाणून घेऊया. 'झुंज' गझलेचे रसग्रहण वाचूया 'ग    गझलेचा' मध्ये.

याशिवाय फोटो फिचर मध्ये पाहूया पक्ष्यांचे अप्रतिम फोटो. आणि शब्दकोडे सोडवून आम्हाला पाठवायला विसरू नका. आपल्याला आवडलेल्या लेखांना पसंतीची पोचपावती जरूर द्या. लोभ आहेच तो वाढवा हीच विनंती!!!!!

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर



अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 

No comments:

Post a Comment