©सीमा ढाणके |
संपादकीय
कट्टा वाचकांना
सप्रेम नमस्कार!!!!!!
वाचनीय
मजकुराने भरगच्च भरलेला फेब्रुवारी महिन्याचा कट्टा आपल्यासमोर ठेवताना खूप आनंद
होत आहे. ह्या महिन्यात 'डोळस भटकंती' मध्ये वाचा जुन्नरच्या
लेण्यांबद्दल. ५ फेब्रुवारीला वसंत पंचमी आहे. त्या दिवशी होणाऱ्या सरस्वती
पूजनाबद्दलची माहिती वाचा 'लावण्य काही आगळे' ह्या लेखात. 'आकाशझेप'
मध्ये वाचा 'मंगळ आणि त्यापुढील स्वप्नांबद्दल.....' कट्टा मधील ह्या
लेखमालातून वेगवेगळे विषय वाचकांपुढे ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. 'दफ्तर आणि
स्वप्ने' आणि 'जैनेन्द्र' हे लेख वाचायला ही विसरू नका.
गेल्या
महिन्यात दिलेल्या Happy Journey ह्या कथेचा दुसरा भाग वाचायला विसरू नका.
आयुष्याचा प्रवास डोळसपणे केला तर तो नक्कीच आनंदी होऊ शकतो हे आजची तरुण पिढी
जाणते याची खात्रीच पटेल तुम्हांला. कोपनहेगन मधील 'घर संशोधन' करताना
येणाऱ्या अडचणी वाचून मनोरंजन तर होईलच शिवाय ज्ञानात भर पडेल. संक्रांतीच्या
सणाच्या दिवशी मनाचा संवाद झाला तर ह्या सणाचा आनंद द्विगुणित होतो हे जाणवेल. आपण
कसे पुढे मिळणाऱ्या सुखासाठी आजच्या हातातील सुखाला नाकारत असतो हे वाचा 'आनंदासाठी
आनंदाचा बळी' ह्या लेखात.
'स्पंदन' मधील लेख
तुम्हांला नक्कीच आवडतील. त्याचप्रमाणे विडंबन कविता ही जरूर वाचा. शिवाय
शब्दकोडे, फोटो फिचर यांचा आस्वाद घ्या.
आपल्या प्रतिक्रियांची
उत्सुकतेने वाट पाहत आहोत.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
No comments:
Post a Comment