कट्टा फेब्रुवारी २०२१

 

प्राजक्ता सरोदे 

संपादकीय

फेब्रुवारी महिन्याचे मुखपृष्ठ पाहून आश्चर्य वाटले असेल ना?

उपनिषदांधील जी ४ महावाक्ये किंवा अथांगसार सांगणारी वाक्ये आहेत त्यातील हे एक. 'मी ब्रह्म आहे' असा शब्दशः अर्थ होतो ह्या वाक्याचा. त्या परमात्म्याचा आपल्यातही अंश आहे ह्याची जाणीव करून देणारे हे वाक्य.

सध्या कोरोना महामारीच्या काळात, कोणती लस चांगली ह्यावरील मतामतांच्या गलबल्यात मती कुंठीत झालेली असताना स्वतःच्या सद्सद्विवेकबुद्धीवर विश्वास ठेवून निर्णय घेण्याची नितांत गरज आहे.

ह्या महिन्याच्या कट्ट्यात असेच तुम्हांला विचार करायला लावणारे लेख देत आहोत. 'अंतिम सत्य', 'स्वतःशीच संवाद', 'अडगळ' हे लेख तुम्हांला अंतर्मुख करतील. काऊ-चिऊची गोष्ट आठवते? तिच्यातून आपल्याला काय काय सांगितले ते वाचा "चिऊताई" लेखात. तर 'देव तारी ...' ह्या लेखात वाचा मजेसाठी बाहेर पडल्यावर ओढवलेल्या गंभीर प्रसंगाचे खुसखुशीत शैलीतले वर्णन. शिवाय विविध विषयांवरील कविता आणि आपली नेहेमीची सदरे आहेतच.

कट्टा वाचून आपली मते मात्र आमच्यापर्यंत जरूर पोचवा. लेखाखालीही आपण आपले मत देऊ शकता.

कट्टा टीम आपली मते जाणण्यास उत्सुक आहे. लोभ आहेच आणि तो दर महिन्याच्या कट्टा वाचनासोबत वाढतच जाईल ही आशा आहे.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर

अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 


 

No comments:

Post a Comment