कट्टाच्या सर्व वाचकांना २०२२ हे वर्ष सुख-समाधानाचे आणि आरोग्यपूर्ण जावो. २०१६ मध्ये 'मित्रमंडळ बंगळुरू' या संस्थेतर्फे सुरु केलेला हा उपक्रम सातत्याने आणि चांगले साहित्य घेऊन समोर येत आहे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.
ह्या कट्टा
मध्ये २००१ साली भूज, गुजरात येथे झालेल्या 'भूकंपासंबंधी लेख' दिलेला आहे.
अशा नैसर्गिक आपत्तीतून प्रचंड हानी होतेच पण त्याचवेळी या आव्हानाला तोंड
देण्यासाठी कसे सुसज्ज रहावे याचे शिक्षण ही मिळते. भूकंपाचा हा 'आंखो देखा हाल'
जरूर वाचा. त्याशिवाय 'कोपनहेगेन डायरी' या लेखांच्या पहिल्या भागात वाचा
नव्या देशांत गेल्यावर येणाऱ्या विविध, मासलेवाईक अनुभवांबद्दल.
जानेवारीत आपण
तिळगुळ देतो साऱ्यांना. गुळाचा गोडवा आणि तिळाचा स्निग्धपणा आयुष्यात राहावा
म्हणून. असाच गोडवा, आपलेपणा "मैत्री" आणते आपल्या आयुष्यात. पण त्यासाठी वेळ मात्र
काढायला हवा. कसे ते वाचा 'एक उनाड दिवस' मध्ये. लग्नाचा प्रवास आनंदी कसा
होऊ शकेल ते वाचा... Happy Journey या कथेत.
कविता दोनच
आहेत ह्यावेळी, पण रसिकांच्या मनाचा ठाव नक्कीच घेतील. 'मित्रमंडळ बंगळुरू' या
संस्थेतर्फे सादर झालेल्या कार्यक्रमांचा report वाचा. सोबत या कार्यक्रमांच्या
you tube links ही देत आहोत.
विविध विषयांना
स्पर्श करणाऱ्या लेखमाला वाचताय ना? इतिहास सांगणारे वीरगळ, ज्ञानेश्वर माउली
समाधी सोहळा, अवकाशयाने, मन्नू भंडारी आणि सुरेश भट यांची भेट होईल ह्या
लेखमालातून......सोबत शब्दकोडे, फोटो फिचर आहेतच.
कट्टा कसा
वाटला ते कळवा जरूर. आणि हो या नव्या वर्षात कट्टा नियमितपणे वाचायचा संकल्प करायला
विसरू नका.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
No comments:
Post a Comment