कट्टा जुलै २०२१

 

"विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल "

संपादकीय

जून महिना सुरु झाला की वेध लागतात ते पावसाचे. ग्रीष्माच्या तलखीने सगळे हैराण झालेले असतात. अशा वेळी आलेला पाऊस तनमनाला सुखावून जातो. ह्यावेळी हेच रूपक lockdown आणि unlock ला चपखल बसतेय नाही का? ह्या सततच्या लॉकडाऊन मुळे सगळेच आता बाहेर पडायला आतुर झाले आहेत. अर्थात सावधगिरी बाळगूनच बाहेर पडायला हवे हे नक्की. 

ह्यावेळच्या कट्ट्यात आहे अद्भुतरम्य महाराष्ट्र ह्या पुस्तकावरची माहिती. बघा भटकायला एखादे नवे ठिकाण सापडतेय का ते! गुरु व प्राचार्य कसा असावा ते वाचा भोसले सर या लेखात. वडिलांची मनोज्ञ आठवण जागवली आहे कल्लोळ ह्या लेखात. आजकाल कृतज्ञता व्यक्त करणे हेच दुर्मिळ झाले आहे. ह्या तणावाच्या काळातही अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांच्याबद्दल आपण कृतज्ञता बाळगायला हवी. अशा गोष्टींची आठवण करून देत आहोत कृतज्ञ मी ह्या लेखात. हरवलेल्या आईच्या पत्राची आठवण करून देतानाच माणसा-माणसातील संवाद तर हरवला नाहीये ना हे ही सगळयांनीच तपासून पहायला हवे आहे.

हल्ली कथालेखन हा साहित्यप्रकार थोडा मागे पडला आहे. पण ह्या कट्ट्यात सादर करीत आहोत दोन कथा. छोट्याशा पण मनाला भिडतील अशा. वाचकांना आवडतील अशी आशा आहे. आपल्या लेखमालेतून आपण जीवन कौशल्ये कोणती, ती प्रयत्नांनी अंगी कशी बाणवावीत ह्याचे मार्गदर्शन करत आहोत. पण तुम्हांला माहितेय का, की अनेक खेळ खेळताना ही कौशल्ये आपण नकळतच शिकत असतो. कसे ते वाचा खेळण्यातून जीवनकौशल्ये ह्या लेखात.

कविता, गीताई, स्वरानंद, आकाशझेप, शब्दकोडे आणि फोटो फिचर यांनी भरलेला असा जुलै महिन्याचा कट्टा आपल्या समोर सादर करीत आहोत. कट्टा मित्र परिवार आवर्जून वाचतील अशी खात्री आहे. लोभ वाढावा हीच विनंती.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा


No comments:

Post a Comment