कट्टा- जुलै २०२२

 

जी. ए . जन्मशताब्दी 

संपादकीय

जुलै कट्टा 'जी. ए. विशेषांक' काढायचा असे आम्ही ठरवले. या महिन्यापासून जी.ए. कुलकर्णी यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरु होत आहे. मराठी वाचकांना, रसिकांना जीए या नावाचा एक आदरयुक्त दबदबा वाटतो. विसाव्या शतकात मराठी साहित्यातील कथा ह्या साहित्य प्रकाराला वेगळे वळण देणाऱ्या लेखकांपैकी ते एक.

प्रामुख्याने 'कथा' हाच साहित्य प्रकार हाताळताना एक वेगळी कथा त्यांनी रसिकांसमोर ठेवली. कथांचे विषय, शैली, त्यातील वातावरण, वर्णन, सर्वच पूर्वसुरीपासून वेगळे. त्यांची कथा म्हटले तर एका व्यक्तीची, पण त्यातील वेदना ही समस्त मानवजातीची. अज्ञाताचा वेध घेणारी, गूढ..... अनेकवेळा विमनस्क, निराश अवस्थेत नेणारी ही कथा, सगळ्यांनाच पेलवते असे नाही. पण रसिकांना ह्या कथांचे आकर्षण जरूर वाटते. अशा ह्या लेखकाच्या लेखनाला कट्टातर्फे ही एक आदरांजली!!!!!

या कट्टामधील जीए एक गारुड, जीए यांचे इंद्रजाल, जीए Pied piper, त्यांच्या 'वीज' या कथेचे रसग्रहण, आणि त्यांच्या पत्रांचा लेखाजोखा....... हे सर्व लेख वाचनीय आहेत. लिहिणारे सर्व जीए यांचे चाहते आहेत. 

या शिवाय कट्टात वाचा कोपनहेगन डायरी भाग ६ वा, आणि मित्रमंडळाने सादर केलेल्या मैफिलीविषयी.... आपली नेहमीची सदरे आहेतच.....

वाचा आणि जरूर कळवा कट्टा कसा वाटला ते..... 

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टावर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टामधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 

No comments:

Post a Comment