कट्टा- जुलै २०२०


अपर्णा चेरेकर 

संपादकीय
जून महिन्याचा कट्टा अनेकांना आवडल्याचे वाचकांनी आवर्जून आम्हाला कळवले. सगळया वाचकांचे मनापासून धन्यवाद. ह्या महिन्यातही वेगवेगळ्या विषयांवरील लेख देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
नातवंडं म्हणजे दुधावरील साय असे जसे म्हणतात, तसेच आजी-आजोबा हे देखील नातवंडांचे आवडते असतात. अशीच एका आजीची आठवण जागवली आहे तिच्या नातवाने. नर्मदा परिक्रमा करणे हे जसे कठीण तसेच किंबहुना त्याहूनही कठीण आपल्या स्वतःच्या रागावर संयम ठेवणे. अर्थात नर्मदा माई ते देखील शिकवितेच. कसे ते वाचा 'युनिफॉर्म' ह्या लेखात. 'तळ्यांचे शहर' ह्या लेखाचा दुसरा भाग, ज्याची अनेकजण वाट पाहत आहेत. कोरोनाने शिकविलेले धडे आणि जगण्याची बदललेली घडी, आत्मनिर्भरता ह्यावरील चिंतन, 'तबला' ह्या वाद्यावरील पुस्तकाचे परिक्षण आणि बागकामाचा छंद किती आनंद देऊन जातो हे सगळे वाचा कट्ट्यातील विविध लेखांत. कोरोनावर होमिओपॅथी उपचाराने काय फरक पडतो हे सांगत आहेत डॉ.प्राची.  
कोरोना आता आपल्या आयुष्याचाच भाग बनला आहे. त्यामुळे तो आपल्या लेखात, कवितात डोकावणारच. पण तरीही पावसाचे स्वागत करणारी प्रसन्न कविता देत आहोत आणि वारीवरील कवितेतून आपल्या विठूरायाला ही आळवीत आहोत.
आपल्या लेखमालेतील हिरु ओनिडावरील लेख जरूर वाचा. बावीस वर्षे निष्ठेने काम करणाऱ्या ह्या सैनिकाची माहिती अचंबित करणारी आहे. 'पालकत्व' लेखमालेतील 'शेवटचा दिस' हा बाविसावा आणि शेवटचा भाग नक्की वाचा.
सर्व लेख वाचून आपली मते जरूर कळवा आणि कट्टा आवडल्यास आपल्या मित्रपरिवारालाही वाचायला द्या.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. 
आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथाकवितालेखइ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे
स्नेहा केतकर

अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 


No comments:

Post a Comment