कट्टा- जून २०२२

 

समीक्षा घरोटे

संपादकीय

जून महिन्याचा कट्टा आपल्या हातात देताना आनंद होत आहे. ह्या कट्टा मध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे लेख  आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पहिल्या चेयरमन अरुंधती भट्टाचार्य यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या INDOMITABLE: A Working Woman's Notes on Work, Life and Leadership ह्या पुस्तकाचे परीक्षण आहे.  

कल्ला ह्या कथेत वाचा एका गावातल्या मृत्यूची गोष्ट......तसेच शततंत्री वीणेचा सिद्ध या लेखात वाचा पंडित शिवकुमार शर्मा यांच्याबद्दल. कोपेनहेगेन डायरीत वाचा डॅनिश लोकांच्या स्वभावाबद्दल. Yesterday या सिनेमाबद्दल वाचा तिचा सिनेमा मध्ये. नुकताच Mother's day झाला...आईच्या भावना वाचा 'तू दाटताना' या कवितेत. 

याशिवाय आपल्या ह्या लेखमालांत वाचा, गौताळा अभयारण्य, हरिशंकर परसाई, आणि हरकत नाही या गझलेचे रसग्रहण! अवीट गोडीचे गाणे भाषेच्या सीमा पार करून कसे सर्वांपर्यंत पोहोचते ते वाचा जीवनस्पर्शी मध्ये !  

याच बरोबर फोटो फिचरहि आहे, आणि शब्दकोडे सोडवायलाही विसरू नका. जी.ए.कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी निमित्त पुढील कट्टा मध्ये खास लेख असणार आहेत.तेव्हा कट्टा नक्की वाचा....

आपली मते कळवत रहा. लोभ वाढता ठेवा हीच विनंती......

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे. 

स्नेहा केतकर



अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 

No comments:

Post a Comment