कट्टा जून २०२१

 कविता भुमराळकर

संपादकीय

१ जूनच्या कट्ट्याचे  मुखपृष्ठ पाहिले ना? दर वर्षी २३ एप्रिलला जागतिक पुस्तक दिन साजरा केला जातो. त्याची आठवण करून देण्यासाठी हे चित्र. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात पुस्तकासारखा दुसरा मित्र सापडणार नाही.

वाचन-लेखन आवडणाऱ्या सदस्यांसाठी हा ई-कट्टा काढायचा असे मित्रमंडळाने ठरवले, त्यालाही आता ६ वर्षे होऊन गेली. लोकांना लिहिते करणे, चांगले विचार सर्वच मराठी वाचकांपुढे ठेवणे हे उद्दिष्ट होते. आज ते बहुतांशी साध्य झाले असे वाटत आहे.

आपल्या हातून काही निसटणार तर नाही ना अशी भीती आपल्याला सतत वाटत असते. याबद्दल वाचा 'जीवनातील फोमो' या लेखात. आराधना ट्रॅव्हल्स वरील लेखात वाचा पर्यटन क्षेत्राच्या सुरवातीची माहिती. मल्याळी भाषेतील 'The Great Indian Kitchen' सिनेमा पाहून मनात आलेले विचारांचे काहूर वाचा 'जेवण जगणं आणि बरंच काही' या लेखात. एक आठवण ह्या लेखातील छोटीशी आठवण तुम्हालाही भूतकाळात घेऊन जाईल कदाचित. मे महिन्यातील प्रचंड उकाडा दोन गोष्टींमुळे सुसह्य होतो. आंबे आणि आईस्क्रीम. त्याबद्दल वाचा 'पॉट आईस्क्रीम' लेखात.

यासोबत देत आहोत मित्रमंडळाच्या कार्यक्रमांचे अहवाल आणि 'दिवस घरी हे राहायचे' ह्या विनोदी, विडंबनपर कविता संग्रहाचे परिक्षण. याशिवाय सादर करीत आहोत मनाला भिडतील अशा कविता आणि फोटो फिचर, शब्दकोडे आणि आपल्या नेहमीच्या लेखमाला.

बरसणाऱ्या मेघांसोबत आणि आपल्या मित्रपरिवारासोबत कट्ट्याचा आस्वाद घ्या. लोभ आहेच, मात्र तो प्रतिक्रियांमार्फत आमच्यापर्यंत नक्की पोचवा. 

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा



No comments:

Post a Comment