कट्टा- मार्च २०२०


HAPPY WOMEN'S DAY!!! 

संपादकीय 
फेब्रुवारी हा महिना तरुणांना प्रेमासाठी, साहित्यिकांना आपल्या मराठी भाषेसाठी, राजकारण्यांना शिवजयंतीसाठी खास करून साजरा करावासा वाटतो. ह्या महिन्याच्या कट्ट्यातही वरील सगळया विषयांवर लेख आहेत. शिवरायांवर 'शिवरायांचा आठवावा साक्षेप' हा सकारात्मक लेख तर 'का म्हणून' ही उद्विग्न करणारी कविता दोन्ही देत आहोत. साहित्यातून समाजमनाचे प्रतिबिंब पडते ते असे.
ह्या महिन्यात इकिगाई भाग २ देत आहोत. हा लेख अनेकांना आवडल्याचे समजले. त्याचप्रमाणे ८ मार्च ला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 'सकम्मांची गोष्ट' सांगत आहोत. त्या आपल्या बंगलोरातील, म्हणून खास त्यांची नोंद घेत, त्यांच्याबद्दल इतरांना ही सांगावेसे वाटले. 'चिमिमांडा नागोसे अडिची" ह्या नायजेरियन लेखिकेच्या पुस्तकाबद्दल माहिती देत आहोत. सर्व स्त्रियांनीच नव्हे तर पुरुषांनी वाचावे असे हे पुस्तक.
प्रेम हे आयुष्यात अनेक अंगांनी येत असते. ह्या कट्ट्यात देत आहोत अशाच बहिण-भावाच्या प्रेमाची गोष्ट. म्हणजे 'दादा एक गुड न्यूज आहे' ह्या मित्रमंडळाने आणलेल्या नाटकाचे समीक्षण. सगळ्यांना हे नाटक फारच आवडले. ह्या नाटकाबद्दल प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आणि कलाकारांची मुलाखत ही देत आहोत.
महाराष्ट्र मंडळाचा शतकपूर्ती सोहळा, गीताई मध्ये सांख्य योग भाग २, समुपदेशन मधील हळुवारपणे मनातील गोंधळ कसा दूर करावा याचे मार्गदर्शन, तर 'पालकत्व' मध्ये कोणत्या भाषेत मुलांना शिकवावे ह्याबद्दल विचार वाचावयास मिळतील. आपण 'मराठी दिन' साजरा करताना तर हा लेख आवर्जून वाचवा असा.
विलायती खाऊ, ड्रेस्डेनचा किस्सा, संत कान्होपात्रा बद्दल माहितीही आवर्जून वाचावी अशीच. एकूणच असा माहितीपूर्ण कट्टा वाचकांसमोर ठेवताना एक समाधान मनात वाटत आहे. तेव्हा कट्टा स्वतः वाचा आणि आपल्या मित्रपरिवाराला ही जरूर पाठवा. 
तुमची मते जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत.
त्यासाठी mitramandalkatta@gmail.com वर mail पाठवा.

स्नेहा केतकर 


लिंक क्लिक करा

No comments:

Post a Comment