कट्टा- मार्च २०२२

 

नीना वैशंपायन

संपादकीय

मार्च महिन्याचा कट्टा अंक हा लता मंगेशकर यांना भावांजली ह्या रुपात देत आहोत. ६ फेब्रुवारीला लता मंगेशकर यांचे निधन झाले ही बातमी सर्वांना स्तब्ध करून गेली. त्यांची गाणी हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता आणि पुढील अनेक वर्षे राहील. 

खरे तर आपल्यापैकी बऱ्याच कमी जणांना लताला प्रत्यक्षात भेटायची संधी मिळाली, पण तिचे स्वर हे आपल्या आयुष्याला व्यापून राहिले आहेत हे उत्स्फूर्तपणे अनेकांनी पाठवलेल्या लेखांतून जाणवेल. तिचे स्वर सामान्य माणसालाही कुठेतरी दिव्यत्वाचा साक्षात्कार घडवतात हेच खरे!!!

आपल्या मनातील सर्व भावना आपल्याला लताच्या गाण्यातून भेटतात. मग ते वात्सल्य असो, कारुण्य असो, गर्वाची भावना असो, देशप्रेम असो, समर्पण असो वा भक्ती असो.....

आपण तिला एकेरी नावानेच संबोधतो ही गोष्ट देखील ती आपल्या ह्रदयाच्या किती जवळ आहे हेच सांगते. अनेकांनी आमच्याकडे आपणहून पाठवलेल्या या सर्व लेखातील भावना  महत्वाच्या ....म्हणून ही भावांजली......

पुढील महिन्यात कट्टा नेहमीच्या रुपात, नेहमीच्या लेखमालांसकट आपल्या भेटीला येईल.

असो...

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

स्नेहा केतकर

अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा


No comments:

Post a Comment