कट्टा-मे २०२०



आभा सेवक 
संपादकीय

गेला संपूर्ण महिना एका अस्वस्थ अवस्थेत गेला. २२/२३ मार्चला सुरु झालेला लॉक डाउन अजून चालूच आहे आणि पुढे काय होणार याबद्दलही मनात साशंकता आहे.

तरीही आम्ही नेहेमीप्रमाणेच काम करून तुमच्यासाठी वाचनाची मेजवानी घेऊन आलो आहोत. तुम्ही सारे ह्या लॉक डाउनच्या काळात आमचा कट्टा मन लावून वाचाल अशी आमची खात्री आहे.
ह्या कट्ट्यात वाचा ' लढा अदृष्याशी ' ह्या विभागात अनेकांची कोरोनाच्या संदर्भातील मनोगते. काही विचार, काही अनुभव आणि काहींनी केलेली प्रेरणादायी कामे. नेहमीच्या लेखमालेत वाचा 'जर्मनीची शरणागती'. दुसरे महायुद्ध संपल्याला ७५ वर्षे झाली आणि आजही आपण एका युद्धाच्या छायेत आहोत हा विचित्र योगायोग नाही का? 
शिवाय नर्मदा आणि यमुना ह्या जीवनदायिनी नद्यांवरील लेख. हे लेख ह्या नाउमेदीच्या काळातही उमेदच देतील. आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ह्यावरील चिंतन वाचा 'ती आणि तिचा समुद्र' मध्ये. 'गीताई' मध्ये वाचा कर्म करत राहण्याचे तत्त्वज्ञान. ह्या काळात कसे वागावे ह्याचे मार्गदर्शन करतायत पूर्वा रानडे.
येत्या महिन्यात गौतम बुद्धांची जयंती आहे. त्यांचा शांतीचा पाठ आज प्रत्येकाने गिरवण्याची आवश्यकता आहे. 
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना जरूर पाठवा, mitramandalkatta@gmail.com वर.
स्नेहा केतकर


अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 

No comments:

Post a Comment