सीमा ढाणके हिरव्या रंगांची ही वेल घनदाट, पिवळ्या फुलांचा त्यावरती थाट लाल कळ्यांचा बदलतो रंग, निसर्गाच्या किमयेने मन होते दंग |
आज सर्वप्रथम सर्व कट्टा वाचकांना नविन मराठी वर्षाच्या आणि १ मे महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!!!!
आजचा दिवस जरी कोरोनाच्या छायेत काळवंडला असला तरीही येणारे वर्ष मात्र शुभ काळ
घेऊन येणार हे नक्की!!!!!
मार्च-एप्रिल आला की चाहूल लागते आंब्यांची आणि पर्यायाने सर्व उन्हाळी पदार्थांची.
त्याबद्दल वाचा 'वाळवणांचा वसंतोत्सव' ह्या लेखात. ह्याच महिन्यात रामनवमीही झाली.
रामाकडे नेहमी आपण देव म्हणून बघतो. पण तो राजा म्हणून कसा होता? याबद्दल वाचा
'रामराज्यातील शासनव्यवस्था' ह्या लेखात.
ह्या महिन्याच्या कट्ट्यात वेगवेगळ्या विषयांवर लेख आहेत. 'आम्हां घरी धन
शब्दांचीच रत्ने' असे आपण म्हणतो. मग हे धन कसे जपून वापरावे ते ही वाचा 'शब्द' या
लेखांत. 'समर शेष है' ह्या लेखात एक वेगळा विचार मांडलाय. बघा पटतोय का. 'जगूया आनंदे',
'स्वरानंद' लेख वाचून आणि गाणे ऐकून प्रसन्न वाटेल यात शंका नाही. चंद्रावर
मानवाने केलेल्या स्वारीच्या आठवणींना उजाळा दिलाय 'आकाशझेप' ह्या लेखात.
लहानग्यांना शिक्षण देणे हे खायचे काम नाही. लॉकडाऊन मुळे हे पालकांच्याही लक्षात
आले असेलच. याबद्दल केलेले विचारमंथन 'शिकायचे तर आहे' या लेखात.
या महिन्यात कविता दोनच आहेत, पण त्या रसिकांच्या मनाला भिडतील अशी आशा आहे.
याशिवाय फोटो फिचर, गीताई, शब्दकोडे, व्हायरल ही मानस कथा अशी मेजवानीच आपल्यासाठी
आणली आहे.
आपल्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. पाठीवर पडलेली प्रेमाची थाप, एखादा कौतुकाचा शब्द, 'कट्टा' आवडल्याची पोच अनमोल आहे आमच्यासाठी. मग वाट पाहु ना आम्ही? इतना तो बनता है दोस्तों.........काय?
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
No comments:
Post a Comment