सचिन पांढरे |
मे महिन्यातील उन्हाळ्याच्या झळा सगळ्यांना बेचैन करत आहेत. पण जिथे पहावे
तिथे लोक प्रवासासाठी निघत आहेत. गेली दोन वर्षे घरात राहिल्यानंतर आता हा कमालीचा
उन्हाळा कोणालाही प्रवासापासून थांबवू शकत नाही.
कट्टातील लेखांमधूनही आपण असेच भटकंतीला जाणार आहोत. अर्थात ही भटकंती
विचारविश्वातील आहे. कोपनहेगेनचा इतिहास वाचूया भाग ४ मध्ये. ह्या कडक
उन्हाळ्याच्या सोबत आंब्यांची मधुरता आहेच. आंबा म्हटले की आठवते कोकण!!!! कोकणातील
लोककलेवर वाचा डोळस भटकंती मध्ये, तर तिथल्याच सुरंगीच्या
फुलांबद्दल वाचा जीवनस्पर्शी मध्ये. हिंदी साहित्यिक नागार्जुन
यांची माहिती ही वाचू हिंदी साहित्यविश्व या सदरात. स्पंदन मध्ये वाचा
विस्मृतीत गेलेल्या भातुकलीबद्दल आणि निसर्गाच्या विभ्रमांबद्दल..
'मनसुबा' ह्या राजन खान यांच्या कादंबरीविषयी
विचार मंथन, 'नाळ' चित्रपट पाहून मनात आलेले विचार आणि 'फायटर' ही कथा
देखील तुम्हांला नक्कीच आवडेल. आपल्या कट्टा मधील स्तंभ लेखिका कल्याणी आडत यांना
यंदाच्या साहित्य संमेलनातील एका कार्यक्रमात आपली गझल सादर करण्याची संधी
मिळाली, त्यांचे कट्टा टीम तर्फे मनापासून अभिनंदन. तसेच ग गझलेचा
मध्ये वाचा इलाही जमादार यांच्या गझल बद्दल....
चावाल तर वाचाल गोंधळलात ना? वाचा आणि आपला गोंधळ दूर करा. याशिवाय वसंत ऋतुतील बहार बघा फोटो
फिचर मध्ये. सोबत शब्दकोडे आहेच.
कट्टा जरूर वाचा आणि कसा वाटला ते कळवा. लोभ आहेच तो वाढावा हीच इच्छा!!!!
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
No comments:
Post a Comment