कट्टा- नोव्हेंबर २१

 


©सीमा ढाणके 

अमावास्या असुनही असे प्रसन्नता,

साडेतीन मुहूर्तांपैकी असे एक पाडवा! 

स्वागत करू या दिवाळीचे 

रोषणाई, फटाके, फराळ अहाहा मन हे प्रसन्न झाले!!!


संपादकीय

नवरात्र संपता-संपताच चाहूल लागते ती दिवाळीची. काही वर्षांपूर्वी दसरा झाला की घरोघरीच्या स्त्रिया दिवाळीच्या फराळासाठी लागण्यार्‍या कच्च्या मालाच्या तयारीला लागत. सोबतच घराची काना-कोपर्‍यातून सफाई आणि नव्या खरेदीची चर्चा चालू असे. काळाबरोबर या सगळ्या गोष्टी बदलत गेल्या, आता तर फराळ ऑर्डर केला जातो आणि दिवाळीच्या आदल्या दिवशी तो घरपोच येतो. बाकी सगळं काही बदललं तरी एक गोष्ट अजुनही तशीच आहे ती म्हणजे मराठी मना-मनात उत्सुकता आणि उत्साह वाढवणारे मासिकांचे दिवाळी अंक. म्हणूनच वर्षभर आपल्या ‘कट्टा’ वर प्रेम करणार्‍या रसिक वाचकांसाठी आम्ही घेऊन येत आहोत ‘कट्टा’ दिवाळी अंक! 

आपल्या सणांसोबतच अमेरिकेतलेही सणवार माहीती करून घेऊया ‘अमेरिकेतील सणवार’ या लेखात. माणसामध्ये जिद्द असली की अवघड वाटणार्‍या गोष्टी कशा साध्य होतात ते What a wonderful Journey या लेखातून कळेल. मनाला सावरायला शिकवणारी, पत्नीचा संसारातील सहभाग जाणवून देणारी आणि पानगळतीचं रहस्य सांगणारी अशा कविता या अंकात आपण वाचणार आहोत. 8 नोव्हेंबर ला महाराष्ट्राचे लाडके दैवत पु.ल.देशपांडे याची जयंती. त्यानिमित्ताने वाचूया ‘पुलस्पर्श’. समुद्री विमानांची आणि दीपगृहांची माहिती घेऊया ‘आकाशझेप’ आणि ‘डोळस भटकंती’ या सदरांमध्ये. सोबत साहित्यिकांची ओळख आहेच.

वाचकहो, ‘कट्टा’ बरोबर या दीपोत्सवात सामील होताना तुमच्या प्रतिक्रिया आमचा आनंद द्विगुणित करतात. 

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहेकट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.

 

💥💥💥💥सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा !!💥💥💥💥

मानसी नाईक



अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 



No comments:

Post a Comment