"सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके । शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते "
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
कविता भुमराळकर 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷 |
दणक्यात गणेशोत्सव साजरा करून आता सगळ्यांना नवरात्रीचे वेध लागले असतील. सध्या सगळीकडे जोरात लसीकरण ही चालू आहे. कोरोनाची देशातील रुग्णसंख्या ही आटोक्यात आहे. थोडक्यात सगळीकडे खरोखरीच उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण आहे. ही परिस्थिती अशीच राहावी हीच त्या विघ्नहर्त्याचरणी प्रार्थना!!!
अशा आनंदी वातावरणात 'कट्टा'ही नव्या रुपात आपल्यासमोर येत आहे. ह्या महिन्यापासून चार नव्या लेखमाला कट्टा वाचकांना वाचायला मिळतील. कोणत्या ते वाचा 'स्वागत नव्या लेखमालांचे' ह्या लेखात. 'आकाशझेप' ही लेखमाला चालूच राहील. वाचकांना त्यातून वेगळी माहिती मिळत आहे असे वाचकांच्या प्रतिसादावरून समजले. नव्या लेखमालाही आपल्याला आवडतील अशी आशा आहे.
त्याचप्रमाणे
दर महिन्याआड 'स्पंदन' ज्यात दोन स्फुट लेख असतील, आणि 'तिचा सिनेमा' हे जुन्या पण
उत्कृष्ट सिनेमांची आठवण करून देणारे लेखही देणार आहोत. ह्या महिन्यातील 'स्पंदन'
ह्या सदरातील 'ताकद की शक्ती' आणि 'पाऊस निनादत होता' हे लेख जरूर वाचा. मनाला
स्पर्शून जाणारे हे लेखन नक्कीच आपल्याला आवडेल.
त्याचप्रमाणे
मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाचा अहवालही देत आहोत. यातील कार्यक्रम you tube वर
असल्याने आपण आपल्या सवडीने ते पाहू शकता. ह्या 'कट्टा' तील 'कु'आजी, 'बाळंतविडा'
हे लेख ही जरूर वाचा नि:स्वार्थीपणे केलेली मदत, प्रेम आपला ठसा मागे ठेवून जातेच.
ह्या वेळी कवितांचा आस्वाद घ्यायला विसरू नका.
मुखपृष्ठापासून
अनेक लेखांतून केलेला देवीचा जागर वाचकांना जाणवेलच. हीच शक्ती येणाऱ्या सर्व
संकटातून आपल्याला तारून जाईल हा विश्वास आहे. येणाऱ्या नवरात्री पर्वाच्या
साऱ्यांना शुभेच्छा!!!! कट्टा वर लोभ आहेच पण तो आमच्यापर्यंत पोचावा ह्यासाठी
लेखाखाली पोच नक्की द्या.
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
No comments:
Post a Comment