🎈🌈🎈Happy New Year 2021🎈🌈🎈 |
संपादकीय
आज १ जानेवारी
२०२१ ह्या नव्या वर्षारंभी तुमच्या हाती कट्टा देताना अतिशय प्रसन्न वाटते आहे.
गेले पूर्ण वर्ष आपण एका अदृष्याच्या छायेत वावरत होतो. आता येत्या वर्षात
कोरोनावरील लस तयार होईल अशी आशा वाटत आहे. ह्या जानेवारीच्या कट्ट्यातूनही असेच आशादायी
साहित्य तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न आहे.
'ओम' ह्या लेखातून
अनुभव घ्या आसमंताशी एकरूप होण्याचा, तर 'आली जरी कष्टदशा अपार' मधून घ्या
सकारात्मकतेची शिकवण. 'फिरते घर' वाचताना तुम्हांला बहिणाबाईंच्या कवितेची आठवण
नक्कीच येईल.
ह्या महिन्यात
राहुल द्रविड ह्या सर्वांच्या लाडक्या क्रिकेटपटूचा वाढदिवस असतो. 'कट्टा' तर्फे
त्याला शुभेच्छा देतानाच, राहुलच्या चाहत्याचे मनोगतही वाचूया 'द द्रविडचा' ह्या
लेखात. २६ जानेवारीला आपला गणतंत्र दिवस असतो. ह्या निमित्ताने जाणून घेऊया
'सैनिकाच्या मनातले' विचार.
कवितांमधुनही स्वप्ने पाहू भरारीची!!!! ह्याशिवाय आपल्या लेखमाला आहेतच. त्यातूनही आपल्याला दिसतात
प्रयत्नांची कास धरणारे राईट बंधू!!!! भक्तीयोगाची महती वाचता येईल गीताईमधून!!!
अशा या उर्जेने भारलेल्या मनानेच स्वागत करूया नव्या वर्षाचे!!!! कट्टा टीम तर्फे साऱ्यांना २०२१ साठी मनापासून शुभेच्छा!!!!!
आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथा, कविता, लेख, इ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर
अनुक्रमणिका लिंक क्लिक करा
No comments:
Post a Comment