कट्टा- जून २०२०

अपर्णा चेरेकर 

संपादकीय

एप्रिल महिन्याप्रमाणे मे महिनाही कोरोनाच्या छायेत गेला. सध्या सर्वांच्याच तोंडी फक्त कोरोना आणि लॉकडाऊन हे शब्द आहेत.  
कट्टा वाचकांना ह्या मूडमधून बाहेर काढण्यासाठी आम्ही परत आपल्या भेटीला आलो आहोत. ह्या कट्ट्यात वाचा, आपल्या बंगलोरमधील अनेक तळ्यांबद्दल. पूर्वी ह्या पाण्याचे नियोजन कसे करायचे त्याबद्दलची रंजक माहिती. मे महिना आणि आंबे हे समीकरण ठरलेले. कट्ट्यातूनही आपल्या भेटीला आला आहे असाच 'आठवणीतला आंबा'! शब्दांत न सांगता येणारे नातेसंबंध, ह्या नात्यांचा प्रवास आणि त्यांचे रेशमी बंध ह्या बद्दल वाचा कट्टयातील कथांत! कट्टयातील कविता मात्र कोरोनाच्या प्रभावाखालीच आहेत. ह्या विषाणूने आपल्या मनाचा किती कब्जा घेतला आहे हेच यातून जाणवते.
कोरोनाचा दूरगामी परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवरही होणार आहे. फक्त आपल्याच नाही तर साऱ्या जगाच्याही. त्याबद्दल माहिती देण्याचा ही प्रयत्न आम्ही केला आहे. ह्या काळातील कठीण परिस्थितीचा सामना वैद्यकीय क्षेत्रातील लोकांना अहोरात्र करावा लागत आहे. त्याबद्दलही आम्ही माहिती देत आहोत. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी थोडी आहे. सोबत भेटीला येत आहेत आपल्या लेखमाला. यातील प्रत्येक सदरातील लेख वाचनीय आहे.
ह्या अशांत मनस्थितीत कट्टा वाचनाने आपल्याला आनंद मिळेल अशी आशा आहे. सांगायला आनंद होतोय की अनेकजण आपणहून आम्हांला आपले साहित्य पाठवत आहेत. असाच लोभ असू द्यावा.
येत्या काळात सगळ्यांनाच ह्या आपत्तीशी लढण्याचे बळ मिळावे ही इच्छा.

आपल्या प्रतिक्रिया आणि सूचना mitramandalkatta@gmail.com वर जरूर पाठवा. 

आमच्या मित्रमंडळ कट्टासाठी कथाकवितालेखइ. लेखन प्रकाराचे स्वागत आहे. कट्टा वर प्रसिद्ध करण्यासाठी आपले साहित्य प्रत्येक महिन्याच्या १२ तारखेपर्यंत गुगल मराठीमध्ये टाईप करून पाठवावे. आपण पाठवलेल्या साहित्याचा प्राधान्यक्रमाने आणि प्रासंगिकतेनुसार विचार करण्यात येतो. कट्टा मधील फोटो फिचरसाठीही आपण स्वतः काढलेले फोटो पाठवू शकता. आपल्या सहभागाची अपेक्षा आहे.
स्नेहा केतकर

अनुक्रमणिका    लिंक क्लिक करा 

No comments:

Post a Comment