सागराला







हा फेसाळ दबदबा तुझा,
की शांत वीराणता..?
अथांग तुझी माया, बापा!
ठाव सांगी निरंतरा.
तू शब्द शब्द अवकाशी
घुमवीशी तुझी गर्जना!
आर्त का, त्या कहाण्यांची,
गर्भी ज्या जिरविल्या!?
एक अखंड समग्र तरी
अंगोंगी रंगांची स्पर्धा
दिव्य रूप नजरोत्तरी
माववू कसे सर्वदा?
प्रणाम तुझ्या आकाराला
धीर, उदात्त, अंतरंगाला
दूर कुठेही व्यस्त जरी मी
साद गवसे थेट काळजाला




प्रज्ञा वझे घारपुरे

No comments:

Post a Comment