क्षण


तो क्षण थांबला,
बरंच  काही देऊन गेला.

एका क्षणातील आनंद
दुसऱ्या  क्षणात वाटून गेला.

क्षण येतात, जातात
कधी थांबतात तर कधी
क्षणात वाऱ्यासारखे
निघून जातात.

पण हेच क्षण,
कधी आठवणी देतात,
कधी स्वप्नं दाखवतात तर,
कधी सुख देतात आणि, कधी आनंद.

आणि या सर्व क्षणांची 
आपण वाट पाहत असतो.
कारण दुसऱ्या क्षणाला काय??
असे सतत वाटत राहते,
आणि तो क्षण पण निघून जातो.


स्नेहा विरगावकर


No comments:

Post a Comment