जीवन कौशल्ये -एक आढावा
वय आणि अनुभवातून आलेले
शहाणपण हे उत्तम मार्गदर्शक असते, यात शंकाच नाही. "स्वभावाला
औषध नाही" हे क्षणभर खरे मानले, तरी त्या
स्वभावाचा जर आपल्याला आणि इतरांना त्रास होत असेल तर त्यावर उपाययोजना करायला हवी
का नको? हा
विचार मनात आल्यावाचून राहत नाही. अर्थात प्रयत्नपूर्वक, थोडेसे
विचारात, कृतीत, वृत्तीत बदल केले तर
काय हरकत आहे? जीवन कौशल्ये आत्मसात केल्याने
दैनंदिन जीवन हे सुकर, सुसह्य आणि आनंदी व्हायला मदतच होईल. यात व्यक्तिगत
फायदे बरेच आहेत हे निर्विवाद सत्य आहे. यामुळे मिळणारे समाधानही तितकेच मोलाचे
असेल.
जीवन कौशल्ये- संक्षिप्त स्वरूपात -
· Self -Awareness - आत्मजागरूकता. यात माझी स्वतःची
ओळख. मग त्यात स्वभाव, व्यक्तिमत्व, अपेक्षा, strength/weakness याचा काळजीपूर्वक केलेला अभ्यास.
·
Empathy- दुसऱ्याच्या भावना समजून घ्यायची क्षमता.
संवेदनशीलता.
· Critical Thinking - कोणत्याही परिस्थितीचा
सर्वांगाने, डोळसपणे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर पारखून केलेला विचार. यात भावना
आणि सद्य परिस्थिती यांचा समतोल साधला गेलेला असतो.
· Creative Thinking - नेहमीपेक्षा वेगळा विचार करून
प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न. धोपट मार्ग न अवलंबता
जरा हटके केलेले विचार. (Out of box thinking)
·
Decision Making - विचारांचे कृतीत झालेले रूपांतर.
तत्पूर्वी (कृती करण्याआधी) पर्याय आणि परिणाम यांचा
साकल्याने झालेला विचार.
·
Problem Solving - प्रश्नाचे स्वरूप नीट समजून
घेऊन त्यावर उपाय शोधणे.
· Intra & Interpersonal Relations- नाते - स्वतःशी आणि इतरांशी
असलेले,
ते निभावणे.
नात्याचा मान जपणे. नातेवाईक किंवा कामांच्या ठिकाणी असणारे सहकारी यांच्याशी
परस्पर मैत्रीपूर्ण, सलोख्याचे संबंध टिकवणे.
· Effective Communication - आपले विचार, मतप्रवाह,
भावना, सल्ला-मसलत, वाणी
आणि देहबोली या माध्यमातून दुसऱ्यापर्यंत प्रभावीपणे
पोचविणे.
· Coping with Stress - शारीरिक आणि मानसिक ताण-तणाव
आपल्याला केंव्हा येतो हे पाहून काय केले म्हणजे यावर मात करता येते याची
उपाययोजना.
· Coping with Emotions - आपल्या मनात येणाऱ्या सकारात्मक
आणि नकारात्मक विचारांबद्दलची जाणीव किंवा त्याबद्दल जागरूक असणे.
ही
जीवन कौशल्ये म्हणजे काही आदर्शवाद
नाही. तर आपल्याला एकदाच लाभलेले हे आयुष्य अर्थपूर्ण
आणि ते आनंदाने जगायला मिळावे यासाठी बहुमूल्य अशी उपयोगी
पडणारी साधने आहेत. "आपण नाही बदलत" किंवा
"आपले आहे हे असे आहे" असे समजणाऱ्या
व्यक्तीने, आपणच आपल्याभोवती कुंपण
करून त्यात राहत नाही ना, याचा विचार करायलाच हवा. काळाबरोबर चालताना विचार, कृती,
वृत्ती यात चांगल्यासाठी बदल केले तर स्वागतार्ह ठरतील.
जीवन कौशल्ये ह्या मालिकेचा हा
शेवटचा भाग आहे. सर्व सामान्यांना याची माहिती व्हावी यासाठी केलेला हा एक
प्रामाणिक प्रयत्न आहे. मित्रमंडळ कट्टाच्या स्नेहा केतकर आणि सहकारी
यांनी मला माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिल्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
कोणाला शंका असल्यास मला ती फोन/ई-मेलद्वारे
जरूर कळवा. मी त्याचे समाधानकारक उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करीन.
ॐ सर्वे भवन्तु सुखिनः।
सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु।
मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥
हीच ईश्वर चरणी प्रार्थना……..
Cell - 98459 52660
Email - poorva.ranade@gmail.com
डॉ. पूर्वा रानडे Ph.D.(Psy.)
No comments:
Post a Comment