मराठी असे, आमुची मायबोली
पाईक तिचेच, राहू सदा काळी
असे ती गोड, अमृताहूनही
विसरु नयेत, ऋण कदा काळी
कसे? किती? वर्णू, तिचे गुण गान
सर्व भाषेत तिची, वेगळी शान
संपन्न, समृद्ध अन् अलंकारिक
तिच्या गौरवाने, उंचाविते मान
भूपाळी गाऊनी, उठवे सकाळी
भक्तिरसाची गाई, उदंड गाणी
वीररसात स्फुरली, पोवाड्यांनी
अभंग-ओवी, जणू गंगेचे पाणी
नवरस संपन्न ही मायबोली
वृत्त, छंद, समासाने नटणारी
ज्ञानदेव तुकाची अमृत वाणी
संस्कार, कला, संस्कृती जपणारी
दिन सोनियाचा, आज उगवला
करू साजरा गौरवाने जियेचा
लिहूनी, बोलूनी, वाचवू भाषेला
ठेवू मान सर्व, जगती तियेचा
No comments:
Post a Comment