कट्ट्यात 'मधले पान' द्यावेसे वाटले, कारण अनेक घडामोडी आजूबाजूला घडत असतात, त्यांची दखल घेणे आवश्यक
असते. त्याबद्दल वाचकांनी विचार करावा असे वाटते.
मे महिना
अखेरीस भारतामध्ये अनेक ठिकाणी लॉकडाऊन शिथिल करण्यात येतो आहे. ह्यासंबंधीचे
निर्णय प्रत्येक राज्य तिथे असलेल्या परिस्थितीनुसार घेत आहे. २५ मे पासून
आंतरदेशीय विमान वाहतूक सुरू झाली. एखाद्या मोठ्या आजारातून उठल्यावर जसे पूर्ववत
व्हायला वेळ लागतो तसे आपल्या देशाचेही झाले आहे असे वाटते. कोरोना आता बराच काळ
आपल्यासोबत असणार आहे, त्यामुळे आयुष्यातल्या सर्वच व्यवहारांत बदल घडून येणार
आहे. सुरवातीला गोंधळ होणारच, जसा तो २५ मेला झाला. ह्या नव्या व्यवस्थेशी जुळवून
घेतच आपल्याला पुढे जायचे आहे.
ह्याच वेळी
आणखी दोन अस्मानी आपत्तींना आपल्याला तोंड द्यावे लागत आहे. एक म्हणजे अम्फान
वादळ, ज्यामुळे ओरिसा आणि पश्चिम बंगालमध्ये अतोनात नुकसान झाले आहे. आणि दुसरे
म्हणजे येमेन, इराण, पाकिस्तान ह्या देशांना तडाखा देऊन भारतात आलेली टोळधाड.
ह्यामुळे उभी पिके नष्ट होण्याची भीती आहे. साधारणपणे दर दिवशी १५० कि.मी. वेगाने
ही टोळधाड पुढे जात आहे. कोरोना, वादळ, टोळधाड आणि हे कमी आहे म्हणूनच की काय,
सर्वकडे अंगार ओतणारा सूर्य - अशा कचाट्यात सामान्य माणूस सापडला आहे.
अशा परिस्थितीत
धीराने जगणाऱ्या सर्वांना सलाम करावासा वाटतो. आणि अशा वेळीही राजकारण करणाऱ्या
राजकारण्यांना काय म्हणावे हे कळत नाही. उद्धव ठाकरे यांच्या महाराष्ट्रात अतिशय
वाईट परिस्थिती आहे. कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ आहे; पण ते रेल्वे
मंत्र्यांना नावे ठेवण्यात गर्क आहेत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन ‘लॉकडाऊनमुळे
फारसा फरक पडला नाही, आणि आता लॉकडाऊन शिथिल करण्याची वेळ पण चुकली,’ असे
सांगितले. खरेतर जगातले सर्वच देश आपापल्या परीने ह्या महामारीशी मुकाबला करत
आहेत. त्यांचे निर्णय योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवेल. ह्या सर्व देशांत
तुर्कमेनिस्तानने केलेला उपाय फारच नामी आहे. त्यांनी कोरोना ह्या महामारीलाच
नाकारले आहे आणि हा शब्दही उच्चारण्यास आपल्या नागरिकांना मनाई केली आहे. अर्थात
त्या देशांत हुकूमशाही आहे म्हणूनच असे एकतर्फी निर्णय घेता येतात.
ते पूर्वी खेळाडू असल्याने आपल्याला कोरोनाचा संसर्ग होणे शक्य नाही असे
त्यांना वाटते. अमेरिकेत मियामी येथे बीचवर हजारो माणसे पोहण्यासाठी जमा झाली.
शेवटी प्रशासनाला बीच बंद करावा लागला. त्याचप्रमाणे ह्युस्टन येथे लोकांनी मोर्चा
काढून ‘मास्क घालणे हे आमच्या स्वातंत्र्यावर आक्रमण आहे’ असे सांगितले. तर
ट्रेव्हर नोआ ह्या अमेरिकेतील प्रसिद्ध विनोदी राजकीय समालोचकाने आपल्या
कार्यक्रमातून लोकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी मास्क घालावा असे आवाहन केले.
इथे बंगलोरमध्ये, मंत्री महोदय सदानंद गौडा विमानातून उतरल्यावर थेट आपल्या
गाडीत बसून घरी गेले ह्यावर गदारोळ चालू आहे. तर तिकडे ब्रिटनमध्येही कमिंग
ह्यांनीही प्रवासावर निर्बंध असतानाही
प्रवास केला. त्यामुळे पंतप्रधान जॉन्सन अडचणीत सापडले आहेत. आत्ता 'मधले पान' लिहीत
असताना द. कोरियातील कोरोना रुग्णांत लक्षणीय वाढ झाली असे वाचले. परत लॉकडाऊन करावा
का अशा विचारात तिथले सरकार आहे. असो.
आता काही
वेगळ्या बातम्या. कोरोनाच्या काळात मनोरंजन क्षेत्रावरही अवकळा आली आहे. सिनेमा,
नाटक, सिरियल्समध्ये काम करणारे सगळे कलावंत, तंत्रज्ञ घरी आहेत. तयार असलेले
सिनेमा आता OTT म्हणजे Over The Top platorms वाहिन्यांवरून प्रदर्शित करावे असा
चित्रपट निर्मात्यांचा विचार आहे. ह्याला अर्थातच चित्रपटगृहांचे मालक, मॅाल्सचे
मालक यांचा विरोध आहे. मनोरंजन क्षेत्रात तशीही उदासीनता पसरलेली आहे.
इरफान गेला
म्हटल्यावर अगदी आपल्या घरातीलच कोणीतरी गेला अशी अनेकांची भावना झाली. Life of Pi
मधील रिचर्ड पार्करने जाताना मागे वळूनही पाहिले नाही असे सांगतानाचा दुखावलेला इरफान,
“यह शहर हमें जितना देता है… बदले में कहीं ज्यादा ले लेता है…” असे
सांगत कोंकणा सेन-शर्माला आधार देणारा इरफान, 'मुंबई मेरी जान'मधील हॉस्पिटलमधून
बाहेर पडणाऱ्या त्या वृद्धाला फुले देणारा इरफान, आणि पिकूमधील तिरसट अमिताभला
त्याच्याच भाषेत उत्तर देणारा इरफान! अनेक
भूमिकांवर त्याने आपली अमीट अशी छाप सोडली आहे. त्याच्या अकाली जाण्याने
एक उमदा आणि हरहुन्नरी कलाकार ह्या इंडस्ट्रीने गमावला आहे.
ऋषी कपूर! पदार्पणातच राष्ट्रीय पुरस्कार मिळवला त्याने. पण आपल्या मर्यादा,
आपले शक्तिस्थान जाणून त्याने आयुष्यभर काम केले. कपूर घराण्यातील तिसऱ्या पिढीतील
हा एकमेव खंदा वीर. पहिली इनिंग गाजलीच; त्याची दुसरी इनिंगही वैविध्यपूर्ण
भूमिकांनी मस्त रंगत असतानाच त्यांनी
एक्झिट घेतली.
ह्या दोघांप्रमाणेच रत्नाकर मतकरी ह्या बहुआयामी
लेखकाने आणि शामला भावे ह्या उभय गान विदुषीने ह्या जगाचा निरोप घेतला. कोणताही विषय आणि लेखन प्रकार मतकरींना वर्ज्य नव्हता. बालनाट्य ते कथा, कादंबरी, ललितलेखन, नाट्य दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांत लीलया वावरत असताना, एकीकडे चित्रेही काढत असत. बहुआयामी असे त्यांचे वर्णन करता येईल. मला स्वतःला त्यांची बालनाट्य आणि गूढकथा लेखन ह्या क्षेत्रांतील कामगिरी अनमोल वाटते. शामला भावे ह्या बंगलोरातील आणि हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीतातील एक आदराने घेतले जाणारे नाव. शेषाद्रीपुरम
भागात ‘सरस्वती संगीत विद्यालय’ ह्या आपल्या विद्यालयात त्यांनी अनेकांना संगीत शिकविले.
लेखकाने आणि शामला भावे ह्या उभय गान विदुषीने ह्या जगाचा निरोप घेतला. कोणताही विषय आणि लेखन प्रकार मतकरींना वर्ज्य नव्हता. बालनाट्य ते कथा, कादंबरी, ललितलेखन, नाट्य दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रांत लीलया वावरत असताना, एकीकडे चित्रेही काढत असत. बहुआयामी असे त्यांचे वर्णन करता येईल. मला स्वतःला त्यांची बालनाट्य आणि गूढकथा लेखन ह्या क्षेत्रांतील कामगिरी अनमोल वाटते. शामला भावे ह्या बंगलोरातील आणि हिंदुस्तानी आणि कर्नाटक संगीतातील एक आदराने घेतले जाणारे नाव. शेषाद्रीपुरम
भागात ‘सरस्वती संगीत विद्यालय’ ह्या आपल्या विद्यालयात त्यांनी अनेकांना संगीत शिकविले.
प्रसिद्ध हॅालीवुड दिग्दर्शक रॉब गिब्ज ह्याचेही वयाच्या
५५व्या वर्षी निधन झाले. नुसते नाव वाचून कदाचित काही कळणार नाही, पण Toy Story-2,
Finding Nemo, Inside out हे सिनेमे आठवतात ना? ह्या चित्रपटांचा तो दिग्दर्शक
होता. Pixar Studios ला त्यानेच ऑस्करपर्यंत पोचवले म्हणा ना!
त्याचप्रमाणे भारतीय हॉकीच्या सुवर्णयुगाचा शिल्पकार बलबीर सिंग यांचेही निधन
झाले ह्या सर्वांना कट्टा टीमतर्फे
भावपूर्ण श्रद्धांजली!!!
आता भारतीयांना अभिमान वाटेल अशी
बातमी. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन ह्यांची नियुक्ती जागतिक स्वास्थ्य
संघटनेच्या (WHO) कार्यकारी संचालकपदी नेमणूक झाली
आहे. दिल्लीत भाजपची सरकारे असतानाही डॉ. हर्षवर्धन यांनी या शहर-राज्याचे आरोग्य मंत्रिपद सांभाळले. पण विचार देशाचा केला! १९९४ पासून त्यांनी पोलिओमुक्त भारत मोहिमेला संघटित प्रयत्नांची दिशा दिली. याची दखल घेऊन त्यांना १९९८ मध्ये डब्ल्यूएचओतर्फे प्रतिष्ठेचे ‘महासंचालक पदक’देखील मिळाले होते. आता याच संस्थेत, ३४ कार्यकारी सदस्य-देशांच्या प्रतिनिधींचे नेतृत्व डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे असेल. त्यांचे मनापासून अभिनंदन!
आहे. दिल्लीत भाजपची सरकारे असतानाही डॉ. हर्षवर्धन यांनी या शहर-राज्याचे आरोग्य मंत्रिपद सांभाळले. पण विचार देशाचा केला! १९९४ पासून त्यांनी पोलिओमुक्त भारत मोहिमेला संघटित प्रयत्नांची दिशा दिली. याची दखल घेऊन त्यांना १९९८ मध्ये डब्ल्यूएचओतर्फे प्रतिष्ठेचे ‘महासंचालक पदक’देखील मिळाले होते. आता याच संस्थेत, ३४ कार्यकारी सदस्य-देशांच्या प्रतिनिधींचे नेतृत्व डॉ. हर्षवर्धन यांच्याकडे असेल. त्यांचे मनापासून अभिनंदन!
'मधले पान' लिहित असतानाच तिकडे चीन लडाखमध्ये घुसखोरी करत आहे. नेपाळनेही
काही भारत विरोधी विधाने केली आहेत. काही भारतीय खासदारांनी तैवानच्या अध्यक्षांचा
शपथविधी पाहिला म्हणूनही चीन संतापला आहे. हाँगकाँगमध्येही अशांतता आहे. हाँगकाँगमध्ये
राहणाऱ्या नागरिकाने चीन सरकारच्या अधिकारक्षेत्रात काही गुन्हे केल्यास त्याचे
चीनला थेट प्रत्यार्पण
करण्यात येईल, अशा तरतुदींचे एक विधेयक चीनच्या प्रशासनाने
हाँगकाँग सरकारपुढे ठेवले. हे विधेयक मागे घ्यावे यासाठी लाखो तरुण रस्त्यावर उतरले
आणि त्यांनी सरकारी इमारती व विधीमंडळ सभागृहापुढे निदर्शने केली. तैवान असो की हाँगकाँग,
भारताची सीमा असो की दक्षिण चिनी समुद्री अधिक्रमण - सगळीकडे चीनचा वाढता साम्राज्यवाद दिसून येतोय. आणि तोही
जगभरचे देश चीनला कोरोना महामारीसाठी जबाबदार धरत असताना! ह्या सर्व गोष्टींचे
परिणाम येत्या काळात जागतिक राजकीय, आर्थिक क्षेत्रावर नक्की होतील.
जॉर्ज फ्लॉइड ह्या आफ्रिकन वंशाच्या व्यक्तीचा मृत्यू मिनियापोलीस
येथे पोलीस कस्टडीत झाला. या संबंधित व्हिडिओ क्लीप ही अनेकांनी पाहिली. त्यानंतर अमेरिकेतील
अनेक शहरांत मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु झाला आहे. ह्याचे पडसाद व्हाईट हाऊस मध्ये
ही उमटले. अनेक निदर्शकांनी व्हाईट हाऊसला शुक्रवारी रात्री गराडा घातला.
अमेरिकेतील
वंशवाद मोठ्या प्रखरतेने लोकांसमोर येत आहे. अशा घटनांनी ह्या देशाचा भेसूर चेहरा
ही जगासमोर येत आहे.
इथेच
थांबते.
स्नेहा केतकर
No comments:
Post a Comment