छांदिष्ट
मुलासारखं
माझ्याबरोबर चालता
चालता
मधेच हात सोडून
मागे मागे रेंगाळणाऱ्या
--
माझ्या मनाला
जात्या दिवसाबरोबर ओढत
नेताना
दमून जाते मी!
दिवसभराची धावपळ संपवून
रात्री जमाखर्च आठवताना
--खर्चाची बाजू खूप भरते.
नोकरी, स्वयंपाक,
आजारपणं--
झाडलोट, पाहुणे,
खुशालीची पत्रं!
--खरेदी - आणखी असं
बरंच काही
--जमेची बाजू सारी
कोरीच
दिवसभराचं श्वास घेणं!
-- आणि-- तुझ्यात
हरवलेले काही क्षण!
मी पान
परतते
उद्याच्या
दिवसासाठी
वर लिहिते
'मागील जमा'
"तुझी
आठवण-'
मधुस्मिता
अभ्यंकर
No comments:
Post a Comment