मन माझे....!



मन...एक मित्र........बरं वाईट सांगणारं!
मन...एक होकायंत्र......योग्य दिशा दाखवणारं!
मन...एक चित्रकार......सुंदर स्वप्न चितारणारं!
मन...एक कठोर वडीलधारं......चुकलं की डोळे वटारणारं!

मन...एक काठी.......चुकीला सपसप चालवणारं!
वेडंवाकडं घडलंच तर......कडक शिक्षा देणारं!

मन...एक होडकं......हवं तस्सं भरकटणारं!
शीड लावलं तरच......वेगाला पेलणारं!

मन...एक सूर्य......अस्ताला नाकारणारं!
मन...एक अग्नीशिखा......अन्यायाने पेटणारं!

मन...एक चंद्र......शीतल चांदणं बरसवणारं!
मन वघं विश्व........आसमंती भारलेलं!

मन...एक जंजाळ......सा-या गुंत्यात अडकलेलं!
मन...एक ह्रदय...कारूण्याने भरलेलं!

मन...एक तहान......ज्ञानार्जनासाठी आसुसलेलं!
मन...एक ब्रह्म......सा-यात असून..नसलेलं!

मन...एक आत्मा......ब्रम्हांड व्यापलेलं!
सौंदर्याला दाद देत.......कृतज्ञतेने नमणारं!
मन...एक...निर्मळ हास्य......आनंदे आशीर्वच देणारं!!


स्मिता शेखर कोरडे






No comments:

Post a Comment