"हा लेख वाचलास?" संडे टाईम्सची पुरवणी दाखवत मी तिला विचारलं. "इंटरेस्टिंग रिसर्च केलाय ह्या यु.एस. मधल्या विद्यापीठाने. ते असं म्हणतायत की 'फाईन्ड युअर पॅशन' हा चुकीचा सल्ला आहे. त्याऐवजी 'डेव्हलप युअर पॅशन' असा सल्ला द्यावा."
"आज 'मानस'शास्त्राचा क्लास आहे म्हणजे", ती कॉफीचे कप घेऊन येता येता म्हणाली... "अरे पण ह्या दोन सल्ल्यात फरक काय आहे?"
"ऐक तर. माणसांच्या दोन प्रकारच्या माईंड सेट्स असतात - फिक्स्ड माईंड सेट आणि ग्रोथ माईंड सेट. फिक्स्डवाल्यांना कुठलीही नवीन गोष्ट आधी खूप एक्सायटिंग वाटते, पण जेव्हा त्यातल्या किचकट डिटेल्स शिकायची वेळ येते, किंवा पहिल्या-दुसऱ्यांदा ती गोष्ट नीट जमत नाही तेव्हा त्यांचा इंटरेस्ट लगेच उतरतो. मग त्यांना वाटतं की ही माझी पॅशन नाही. फाईंड समथिंग एल्स. ग्रोथ माईंड सेटची माणसं त्या शिकायच्या प्रोसेसमधून यशस्वीपणे जातात. ते पॅशन 'डेव्हलप' करतात. कुठलीही गोष्ट आपण चांगली करायला लागलो की आपोआप ती आपली पॅशन बनते... आता फिक्स्ड माईंड सेटचं उदाहरण द्यायचं झालं तर..."
"उदाहरणार्थ, तिथे धूळ
खात पडलेली गिटार, जी तू गेल्या वर्षी आणलीस, आणि दोन
क्लास झाल्यावर कंटाळून बाजूला ठेवलीस?" तिने
तत्परतेने थियरीला उदाहरणाची जोड दिली.
(स्कोर०-१).
"किंवा तू
आणलेलं ते बेकिंग कोर्सचं पुस्तक? जे पहिले
दोन केक फसल्यानंतर तसंच टेबलच्या कप्प्यात पडून राहिलंय?"- मी.
(स्कोर१-१).
"असू दे. सारखं ते बोलून दाखवायची गरज नाहीये... पण ऐक ना. मी काय म्हणते. ही गोष्ट नात्यांना पण अप्लाय होते. प्रत्येक नातं सुरुवातीला एक्सायटिंग वाटते. पण एकत्र राहिल्यावर त्याला जे छान ऍडजस्ट करतात, ते नात्याला पुढच्या पातळीवर नेतात. जे सुरुवातीच्या हनिमून पिरीयडनंतर येणाऱ्या रुटिन आणि एकमेकांच्या न पटणाऱ्या गोष्टींतच अडकतात, ते फिक्स्ड राहतात."
"अरे वा. हे
मस्त आहे. आज आपल्याकडून ही शिकायला मिळतंय मॅडम. आवडलं आपल्याला."
"अजूनही बरंच
काही शिकवू शकते मी.." तिचे डोळे अतिशय खोडकर दिसत होते. माझ्या हातून पेपर
खेचून, "कॅच मी.." म्हणून मला चिडवत ती
बेडरुमच्या दिशेने पळाली. शिकण्यासाठी मी सुद्धा तयारच असतो. आमच्या रविवारची
सुरुवात परफेक्ट झाली होती!! ... आणि तुमची??
मानस
(काल्पनिक.
तरीही या गोष्टीतल्या पात्रांशी आपणास कोणतेही साम्य आढळल्यास तो चांगलाच योगायोग
समजावा.)
No comments:
Post a Comment