मला तुम्ही देव मानलं, का म्हणून
अबीर गुलाल मला वाहिला, का म्हणून
जयंतीचे बॅनर्स झळकती चौकाचौकात
उंच झेंडे, पताका फडकती, का म्हणून
पुतळे सजती, मंडप उभारती, स्पीकरचा गोंगाट
राजकारण्यांचा उरुस माजला, का म्हणून
बुरुज ढासळे, तट कोसळे, किल्ला आक्रंदे
तरी मिरवणुकीचा जोर वाढला, का म्हणून
रयत त्रस्त, पोरीबाळी स्वस्त, नेते भ्रष्ट,
तरी इव्हेंट जयंतीचा सर्वत्र गाजतो, का म्हणून
-विवेक ताटके
No comments:
Post a Comment