एक सामाजिक संस्था १०० वर्ष कार्यरत आहे असे खूप कमी बघायला मिळते. बेंगळूरू मधील महाराष्ट मंडळ या संस्थे ला यावर्षी १०० वर्ष पूर्ण होत आहेत. १९२० साली एक सरकारी कर्मचारी श्री जोशी यांनी हे मंडळ स्थापन केले. त्याकाळचे गणेशोत्सव ते आताचे अनेक कार्यक्रम सादर करण्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मोठा हातभार आहे. यावर्षी अनेक उत्साही कार्यकर्त्यांच्या साथीने महाराष्ट्र मंडळाने जन्मशताब्दी वर्ष साजरे करायचे ठरवले आहे. दि १९ जानेवारी ला शताब्दी वर्षा चे उदघाटन म्हणून जन्मशताब्दीच्या सोहळा संपन्न झाला.
सभागृहाच्या बाहेर छान रांगोळी काढली होती. तसेच शताब्दीपूर्ती निमित्त मंडळाने काही souvenirs आणि इतर काही स्टॉल्स मांडले होते. शेजारच्या छोट्या हॉल मध्ये मराठी व दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांचे स्टॉल्स होते. मुख्य सभागृहात विविध कार्यक्रम सादर केले गेले.
मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले कलाकार श्री सचिन खेडेकर यांच्या गप्पा खूपच रंगल्या. मराठी भाषा व मराठी संस्कृती चे जतन महाराष्ट्रा पेक्षा महाराष्ट्राबाहेर जास्त होते आहे असे त्यांनी आवर्जून सांगितले.
सभागृहाच्या बाहेर छान रांगोळी काढली होती. तसेच शताब्दीपूर्ती निमित्त मंडळाने काही souvenirs आणि इतर काही स्टॉल्स मांडले होते. शेजारच्या छोट्या हॉल मध्ये मराठी व दक्षिण भारतीय खाद्य पदार्थांचे स्टॉल्स होते. मुख्य सभागृहात विविध कार्यक्रम सादर केले गेले.
लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन आणि बेंगुळूर मधील विद्यमान खासदार तेजस्वी सूर्या हे उदघाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
शहाजी भोसले व होळकरांच्या काळापासून मराठी माणसे कर्नाटक व मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत आणि ती परंपरा अजून चालू आहे असे सुमित्रा ताई त्यांच्या भाषणात म्हणाल्या. नवनिर्वाचित तरुण खासदार तेजस्वी सूर्या ह्यांनी बेंगुळुरू येथील आपल्या मराठी जनतेशी संवाद साधला.
मंडळाच्या अध्यक्षा रेखा नाईक यांनी मंडळाची थोडक्यात माहित सांगितली. १०० वर्षाची वाटचाल एका slide show स्वरूपात दाखवण्यात आली.
सोहळ्याच्या उत्तरार्धात "जल्लोष शताब्दीचा" या संगीतमय कार्यक्रमाने धमाल आणली. मराठी सिनेश्रुष्टीतला हरफन मौला अवधूत गुप्ते यांची गाणी आणि अभिनेत्री दिप्ती भागवत यांचे सूत्रसंचालन याने कार्यक्रमात खूपच बहार आली. अवधूत गुप्ते बरोबर कौस्तुभ गायकवाड व मुग्धा कऱ्हाडे यांची ही गाणी सादर झाली.
दिप्तीने कलाकारांची व्यथा मांडणारी एक सुंदर कविता सादर केली. तब्येत खराब असताना देखील अवधूत गुप्तेनी जोशपूर्ण गाणी गायली. एकंदरीत कार्यक्रम जल्लोषात पार पडला.
जन्मशताब्दीच्या ह्या पहिल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला होता. पुढील वर्षभर अनेक कार्यक्रम होणार आहेत आणि त्या सर्वच कार्यक्रमांना अशीच गर्दी करून आपण हे जन्मशताब्दी वर्ष साजरे करूया !!!

सारंग गाडगीळ
No comments:
Post a Comment