माझ्या हातून पुन्हा पुन्हा
घडत राहतो तोच गुन्हा
गुन्हा तरी कसा
म्हणावा
मदतीचा हात द्यायलाच
हवा
कुणी असा कुणी कसा
कुणी असा तर कुणी तसा
कुणाचा असो काही कावा
मदतीचा हात द्यायलाच
हवा
बहुतेक लोक असेच असतात
बोट दिले की खांद्यावर
बसतात
आपण त्रास कां करावा
मदतीचा हात द्यायलाच
हवा
खरी गोष्ट अशी असते
आपल्यालाच खाज असते
विचार असला कशाला हवा
मदतीचा हात द्यायलाच
हवा
दुसऱ्याने वागावे कसे
काही
यावर आपला ताबा नाही
आपला स्वभाव का बदलावा
मदतीचा हात द्यायलाच
हवा
संजय बापट
No comments:
Post a Comment