कृतज्ञ मी...🙏🌿🌹🌿

 




सकाळी उठल्याबरोबर 'कराग्रे वसते लक्ष्मी' म्हणतो, भूमीला स्पर्श करण्याआधी तिची क्षमा मागतो, आजचा दिवस दिसला देवा तुझ्यामुळे, यासाठी धन्यवाद देतो...हे तर खरंच... धार्मिक असो वा नसो पण थोडी अध्यात्माची जोड असली की आयुष्य जास्त समाधानी आणि सुंदर होतं, हे आपण सारे जाणतोच!

स्वतःचं व्यक्तिमत्त्व विकसित होतंय ना, उत्तम विचारांची-आचारांची माणसं आपल्या आसपास राहताहेत ना, आपली सकारात्मकता वाढीवर आहे ना, हे पुनः पुनः पडताळून पहातो...आपल्या कोणत्याही चुकीच्या विचार वा कृत्यामुळे इतर कुणाला हानी तर नाही पोचत आहे, हे पहातो, सतत रसिकतेने सुंदर कला, साहित्य, संस्कृतीचा पाठपुरावा करतो उत्तमोत्तम मित्र मैत्रिणी जोडतो, आतून येणारे अंतर्नाद ऐकून सर्जनशील राहतो.... स्वतः चे आचार विचार - प्राचीन आणि आधुनिकतेचे सुवर्णमध्य साधून घासून पुसून स्वच्छ करत राहतो... जरूर दिसेल तिथे जमेल तशी मदत आपण करतो... कर्तृत्व, दातृत्व , चिंतन, विचार , निस्वार्थीपणे सल्ला देणं, समाजाचं भलं चिंतणं आणि प्रामाणिक प्रयत्न करत राहणं हे चांगला माणूस म्हणून आपण जर करत असलो... स्वतः आनंदात राहून इतर कसे आनंदात राहतील यासाठी प्रयत्न करत असलो, सद्य परिस्थितीत सुरक्षेची पुरती काळजी घेणं, घरातील माणसांची काळजी घेणं, हे करत असलो तर .. आणखी काय हवं?

 

स्वतःला जपूनही आपण समाजव्यवस्थेवर आपला बोजा पडू न देणं, हेही सद्कार्य आहेच... खूप महत्वाचं! अर्थात् दुर्दैवाने आजारी झालोच तर काय करायचं, याचं नियोजन सध्या सर्वांना करावं लागतं आहे...पण खरोखरच माझ्या आयुष्यात असलेल्या प्रत्येकाची, तुम्हां सर्वांची मी खूप मनापासून कृतज्ञ आहे!


सतत दुःखद बातम्या ऐकूनही सकारात्मक रहाणं - आणि इतकं सगळं करत असल्याबद्दल प्रत्येकाने स्वतःचीच पाठ थोपटायलाच हवी, नाही कां? Bravo दोस्त हो!!



स्मिता शेखर कोरडे


No comments:

Post a Comment