कर्मानुसार फळ मिळते, चांगल्या कर्माचे चांगले.. वाईटाचे वाईट...मानवता हाच धर्माचा मूलमंत्र आहे.
किंवा,
"अय्या अंदरे स्वर्गा, एलवो अंदरे नरका"
नम्रतेनं, दयाळू राहीलात तर स्वर्ग मिळेल..अहंकारानी राहीलात तर नरक"
असे विचार मांडणारे संत बसवेश्वर अथवा बसवण्णा हे १२ व्या शतकातले हिंदू तत्वज्ञानी. ३० एप्रिल ११३४, रोजी अक्षयतृतीयेला, 'बसवण बागेवाडी' या गावी त्यांचा जन्म झाला.
'मादलांबिका ' आणि 'श्रीमहादरसा' हे त्यांचे आईवडील. मोठी बहीण ' नागम्मा ' आणि मेहुणा शिवस्वामी यांच्याकडे त्यांचे बालपण गेले. ८ व्या वर्षी त्यांची मुंज झाली तेव्हा बहिणीची पण मुंज करा असे मत त्यांनी त्या काळी मांडलं होते. बिज्जळन राज्यात मंत्री म्हणून काम केले पण समाजातील असमानता, मूढ अंधश्रद्धा या गोष्टी न पटल्याने 'कूडल संगम' ला गेले. १२ वर्ष तिथे हिंदू देवस्थानामध्ये अध्ययन केले. नंतर लकुलीशा-पशुपाठ या संप्रदायाचं ' शैव शिक्षण संगमेश्वर येथे पूर्ण केलं.

'नीलांबिका' त्यांच्या पत्नी होत्या. १४ जानेवारी ११५५ ला त्यांना परमात्मा दिव्य दर्शन होऊन अनुग्रहीत झाले. निराकार देवाला आकारात न बांधता विश्वाकाराचं रूप देऊन त्यांनी "लिंगदेव" असे नाव दिले.
पाखंडी पौरोहित्य करणाऱ्यांनी वंचित ठेवलेल्या सामान्यांना 'लिंगपूजा' करायला सांगून त्यांना नवीन जीवन दिले. मूर्तीपूजेचे अवडंबर करू नये, स्वकष्टाने जगावे, खोटे बोलू नये, आळस करू नये, कोणालाही फसवू नये, प्राणहानी करू नये, प्राणबळी देऊ नये, दुसऱ्याची पत्नी व धनाची अपेक्षा करू नये, कुठलेही काम कमी-जास्त प्रतीचे न समजता प्रामाणिकपणे करावे या आणि अशाप्रकारच्या समाजकल्याणाच्या गोष्टी जे मानतात, पालन करतात अशा कुठल्याही मानवाला 'शिवशरणर'(शिवभक्त) होता येईल असं सर्वांना सांगत त्यांनी वर्षानुवर्षे पुरूषप्रधान, वर्णजातीभेदाच्या अन्यायामुळे भरडल्या गेलेल्या जनतेसाठी "लिंगायत" धर्माची स्थापना केली. त्यांची १५०० वचने प्रसिद्ध आहेत.
१. षट् स्थल वचना
२. काल ज्ञान वचना
३. मंत्रगोप्य वचना
४. शिखारत्न वचना
अशी त्यांची ग्रंथसंपदा आहे. या ग्रंथांचे तेलगू, तामिळ, मराठी, हिंदी, संस्कृत मध्ये भाषांतर झाले आहे.
'जगद् ज्योती बसवण्णा, क्रांतीयोगी बसवण्णा, भक्ती भंडारी बसवण्णा, महामानवतावादी अशी बिरूदं त्यांच्या भक्तांनी दिली आहेत.
७ जुलै ११९७ ला ' कूडल संगम ' येथे बसवण्णा समाधिस्थ झाले.
"कल बेडा..कोल्ल बेडा" ( भांडू नको.. मारू नको)
हुशीयनुडीयलू बेडा ( खोटं बोलू नको)
तन्न बन्नीस बेडा ( स्वतःचीच स्तुती करू नको)
एदरू अळीयलू बेडा ( दुसरयाचं माप काढू नको)
इदे अंतरंग शुद्धी..इदे बहिरंग शुद्धी (हीच सर्वांगाची शुद्धी)
इदन्नू 'कूडल संगम' मेच्चूवनैय्या ( हेच बसवण्णांना आवडतं, पटतं)
भजनाची लिंक: "ज्ञानद बलदिनद"
भजनाचा अर्थ : "मराठी अर्थ"
भजनाची लिंक: "ज्ञानद बलदिनद"
भजनाचा अर्थ : "मराठी अर्थ"
ज्योती कुलकर्णी
No comments:
Post a Comment