निळाई नभाची निळाई फुलांची
निळीशार स्वप्ने निळ्या पाकळ्यांची
निळा रंग लेऊन वारा सजावा
निळाई असावी मनी कौतुकाची...
निळासा दुरावा मना सोसवेना
निळे मौन झाकी निळ्या वेदनांना
सरावी अता नीलवर्णी प्रतीक्षा
निळे सूर हळवे तुला भेटताना...
निळ्या मोहराचेच गारूड मनभर
तिथे पाडतो भूल एकांत निळसर
निळ्या आठवांची निळी हाक येते
तुला भेटता काळ थांबेल क्षणभर...
नरेंद्र देशमुख
No comments:
Post a Comment