मराठी माणसाला दिवाळी अंकाचं आकर्षण असतंच. दिवाळीचा
तो एक अविभाज्य घटक असतो. पद्मगंधा दिवाळी अंकाबद्दल थोडंसं…
या अंकाचं मुखपृष्ठ श्री. रामचंद्र पोकळे यांच्या ‘यौवना सीरीज’मधील एक painting आहे. यातून माणूस आणि निसर्ग यांच्यातील
नातं दिसून येतं.
माणसाचं जीवन विविध कला प्रकारांनी समृद्ध होत असतं.
या सगळ्या कला एकमेकात गुंफलेल्या असतात. त्या आपल्याला आनंद देतात. या अंकात चारुदत्त पांडे यांनी
त्यांच्या ‘दृश्य कलांचा अभ्यास' या लेखात एक विष्णुधर्मोत्तर पुराणातील
कथा सांगितली आहे, ती अशी-
मथुरेचा राजा वज्र हा मार्कंडेय ऋषींकडे जातो आणि
त्यांना देवांच्या मूर्ती बनवण्याची कला शिकवण्याची विनंती करतो. ऋषी म्हणतात, त्यासाठी तुला आधी चित्रसूत्र शिकावं
लागेल. त्यावर राजा ते शिकण्याची तयारी दाखवतो. त्यावर ऋषी म्हणतात, त्यासाठी तुझा नाट्यशास्त्राचा अभ्यास
असायला हवा. राजा म्हणतो मुनीवर मी ते शिकायलाही तयार आहे . त्यावर ऋषी पुन्हा
म्हणतात, नृत्यशास्त्र-वाद्यशास्त्राच्या ज्ञानाशिवाय समजणे
कठीण आहे आणि वाद्यशास्त्र समजण्यासाठी गीतशास्त्राचा अभ्यास असणे गरजेचे आहे.
हेच या अंकाचं सार आहे. सत्यशील देशपांडे, प्राची दुबळे, याचे संगीतावरील लेख, माधुरी आपटे, रचना कापसे यांचे नृत्यशास्त्रावरील, उज्वला अन्नछत्रे यांचा शिल्पकलेवरील
लेख, तसेच लेखन कला हाही एक अभ्यास आहे. असे
वाचनीय साहित्य या अंकात आहे.
थोडक्यात काय तर हा अंक सर्व कलांचा परामर्श घेणारा आहे. कथा, आत्मपर लेखन व इतर लेखही वाचनीय आहेत.
साहित्यविचार, लोकसंस्कृती वगैरे वाचनीय साहित्य यात आहे. तेव्हा हा अंक जरूर वाचा.
वृंदा जोशी
No comments:
Post a Comment