पसारा



कधी मला न कळले, मी मांडला पसारा
कधी न कळले कसा, रंगला खेळ सारा

                             कशाचीच नव्हती आशा, न कशाची अपेक्षा
                             म्हणावी तशी काही, अवघडही नव्हती परिक्षा

तरीही स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट हा             
नाही नाही म्हणतानाच गुंतला जीव हा

                             तेवढे काही नको, तेवढे मोठे नको
                             एवढे एवढे म्हणत, विसरले म्हणाया नको

एवढे एवढे पुढे, आले अनेक आकारा
जमवण्याचा नाद, करू लागला पसारा


 जीव गुंगला, मन रमले, थांबणे विसरले
 सिद्ध करताना स्वतःला, मी स्वतःच हरवले








हरवले ह्या जमवण्यात, हरवून गेले खेळण्यात
लागले शोधू अस्तित्व माझे, मांडलेल्या ह्या पसाऱ्यात

   शांत झाले, स्तब्ध झाले, खेळ थांबवा वाटले
   पसाऱ्याशिवाय अन्य आता अस्तित्त्व ना राहिले


कधी मला न कळले, मी मांडला पसारा
कधी न कळले कसा, रंगला खेळ सारा


अनुजा हर्डीकर सामंत



No comments:

Post a Comment