पावसा, तुला झालंय तरी काय?


पावसा, तुला झालंय तरी काय?
थांबायचं नावच नाही,
की हट्ट सोडायचा नाही
किती गोंधळ घातलायस,
नको नको करून सोडलंयस. 
सांग, सांग पावसा,तुला झालंय तरी काय?

पाणी म्हणजे जीवन ना?
मग घाबरवलंस का सगळ्यांना?
किती पळापळ करावी लागते,
जीवासाठी पहातोयस ना?
सांग,सांग पावसा,तुला झालंय तरी काय

नदी किनारी वस्ती करणारा,
माणूस तिला आवरणार कसा?
बाहेर पाणी घरात पाणी
जीव घुसमटणारं हेच जीवन का?
सांग,सांग पावसा,तुला झालंय तरी काय?

तहान भागली,शेतं पिकली,
शु-पक्षी माणूसही जगेल.
अती वृष्टी अनावृष्टी झाली तर,
तुझी वाट कोण बरं पाहिल?
सांग,सांग पावसा,तुला तरी बरं वाटेल काय?

                              अशोक हवालदार 

No comments:

Post a Comment