मित्रमंडळ बंगळुरू संस्थेने आयोजित केलेल्या कॅलिग्राफी कार्यशाळेमध्ये,
प्रख्यात कॅलिग्राफर अच्युत पालव यांचे प्रत्यक्ष काम करतानाचे काही अनमोल फोटो पाहून
आनंद लुटू या ...
Calligraphy म्हणजे केवळ सुरेख दिसणारी अक्षरे नव्हेत तर त्या शब्दामागचा भाव highlight करणे.. येथे सरांनी श्री या शब्दाला कसे सुरेख व्यक्त
केले आहे.
लिपीतले अक्षर जिथे संपते तिथे पालवसर त्यांच्यातल्या कलाकाराला सुरुवात करायला सांगतो - आणि त्यातून लयदार
लपेटी तयार होतात - शब्दामध्ये जान आणतात. हे दिसतंय सुंदरच - ते प्रत्यक्षात काढताना
इतकं सोपं वाटत होतं. आम्ही प्रत्यक्ष प्रयत्न केल्यावर सरांच्या हातातली जादू समजली!
म्हटलं तर लिहिलंय a to z - पण दिसतोय एक पायघोळ अंगरखा घातलेला सरदार - (किंवा तरुण मनाचे असाल
तर युवती!!)
हे गणेशवंदन
का प्रत्यक्ष गणेश दर्शन?
काय प्रेमात
पडलात ना? या अक्षरांबद्दल बोलतो आहोत आम्ही, बरं का!
ग्रीष्मातली तलखी आणि आता केव्हाही ओसंडणार या स्थितीतला
ढग ... फक्त अक्षरांद्वारे!
पालवसरांचं
देवनागरी इतकंच मोडी लिपीवरही प्रेम; काकणभर जास्तच म्हणा.. देवनागरी आणि मोडीचा
हा एक मोहक मिलाप.
एकदा हात
बसला कि हे तंत्र अक्षरांनाच वापरावे असे थोडीच आहे?
रंगांची उधळण
- ब्लीच वापरून केलेली - वळणदार अक्षरांनी उठावदार केलेली.
No comments:
Post a Comment