PhotoFeature:चित्रं चारोळ्या







तुम्ही राहता टेंशन फ्री , मला घालता साकडे 

तुमचा आहे विश्वास , मी करणार नाही वाकडे 

वर्षभर करणार पाप , त्याचे बांधणार गाठोडे 

अकरा दिवसांच्या पूजेने , संपणार कसे ते गडे !!











दुःखालाही  घाला सुखाचे कपडे , द्या मनाला एकच झोका 

येणाऱ्या संधीचे करा सोने , वाया नका घालू मौका !!













बाटली आयुष्य वाढवणाऱ्या औषधाची, 

                       अथवा आयुष्य संपवणाऱ्या मदिरेची

दृष्टिकोन पाहिजे सकारात्मकतेचा ,


                       फक्त फुले- फळे छे , 


चषक भरला अमृताचा !! 











मी थिरकते एका पायावर, नका करू काथ्याकूट 

का नको होऊ खुश , मला सापडला 


सिन्ड्रेलाचा बूट !!












जरी तुला दिसत असले, 

                            मी नजरेसमोर तुझ्या 


पण शुभ्र वस्त्रांकिता मी ,  


                            प्रियकराच्या मिठीत माझ्या !!












ऊस डोंगा परी रस नव्हे डोंगा, 

             काय भुललासी वरलिया रंगा 


घेऊन एकतारी, 

     
           तल्लीन मी भक्तीमध्ये 

कसे जाईल लक्ष उघड्या माझ्या अंगा !!












डोळा आले पाणी, चेहेऱ्या वरती व्याकुळता 


भुकेलेले  बाळ तान्हे , कुठे गुंतली त्याची माता !!














बुद्धम शरणम गच्छामि !!

             फक्त म्हणून नाही चालणार ,


त्यांच्या उपदेशाप्रमाणे खरंच का तुम्ही वागणार ??


अपशब्दांच्या वाग्बाणांना , माना  तुम्ही फुले 


तरच म्हणा , मला बुद्ध कळे !!


हा दुःखाचा भवसागर ,हसतमुखाने करा पार 

हात जोडुनी उभे पुढे , सुखच सुख अपरंपार!


सुख पाहता जवापाड  , दुःख पर्वताएवढे 


सहन करण्याची शक्ती देई , चला जाऊ 


निसर्गाकडे !!








चित्रकार : डॉ. शीतल बदामी 

चारोळी लेखन : पुष्पा  ढाणके 

No comments:

Post a Comment