🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
टेकडी गणपती (वरदविनायक) - नागपूर
अष्टदशभुजा गणपती, रामटेक
अंदाजे पाच फूट उंचीची, पद्मासनात बसलेल्या गणपतीची ही देखणी मूर्ती अठरा हातांची
आहे.
देवाच्या अठरा हातात पाश, अंकुश, खट्वांग, त्रिशूल अशी विविध आयुधे दाखवली आहेत.
एका हातात मोदक आणि दुसऱ्या हातात मोरपंखाची लेखणी दिसते. अठरा विज्ञानाचे ज्ञान असलेला हा गणपती असल्यामुळे याला अठरा हात दाखवले आहेत. |
शमी विघ्नेश –आदासा
मंदिरात गणेशाची भव्य अशी मूर्ती दृष्टीस पडते.
मूर्तीवर शेंदुराचे लेपन मोठय़ा प्रमाणावर असल्यामुळे मूर्तीची वैशिष्टय़े समजत
नाहीत. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. हे क्षेत्र वामनवरद वक्रतुंड क्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. |
सर्वतोभद्र गणपती – पौनी
इथे गणपतीची मूर्ती नसून त्याऐवजी मंदिरात एक उभा पाषाण आहे
आणि त्याला पाच बाजूंनी पाच तोंडे आहेत. त्यामुळे याला सर्वतोभद्र गणपती, भद्रा गणपती, पंचानन, विघ्नराज अशा विविध नावांनी संबोधले जाते. याच्या सर्व बाजूंनी गणपतीची तोंडे असल्यामुळे कोणत्याही बाजूने याचे
दर्शन घेता येते. |
सिद्धिविनायक एकचक्रा, केळझर
किल्ला
केळझरच्या किल्ल्यावर उंच जागेवर हे गणेश मंदिर आहे.
गणेश मंदिरातील गणेशमूर्ती उजव्या सोंडेची असल्यामुळे याला सिद्धिविनायक असे म्हणतात. पांडवांनी बकासुर वधाची स्मृती म्हणून या गणपतीची स्थापना केली, अशी इथल्या
लोकांची श्रद्धा आहे. प्राचीन काळी केळझर या गावालाच एकचक्रानगरी म्हणून ओळखले जायचे |
भृशुंड गणपती – मेंढा, भंडारा
मंदिरातील गणेशाची मूर्ती आठ फूट उंचीची असून ती सव्यललितासनात बसलेली आहे.
पायाशी नागाचे वेटोळे, त्यावर गणेशाचे वाहन उंदीर आणि त्यावर हा गणपती विराजमान
झालेला आहे. मूर्ती चतुर्भुज असून एक हात वरद मुद्रेत तर इतर हातात अंकुश, पाश आणि मोदकांनी
भरलेले पात्र दिसते. |
वरदविनायक गौराळा-भद्रावती
हे मंदिर असलेली टेकडी पूर्वी गायींना चरण्यासाठी राखीव होती
म्हणून या ठिकाणाला
गौराळा असे नाव पडले आहे.
अंदाजे आठ फूट उंचीची गणेशाची बसलेल्या स्थितीतली मूर्ती आहे. उजवा पाय मुडपून जमिनीवर आहे तर डावा पाय दुमडून शेजारी उभ्या स्थितीत दिसतो.
|
चिंतामणी गणेश –कळंब
प्रसिद्ध एकवीस गणपती क्षेत्रांपकी एक पीठ असलेले प्राचीन कदंबपूर म्हणजेच आजचे
कळंब होय.
इथले गणपती मंदिर काहीसे निराळे आहे. अंदाजे २७/२८ फूट जमिनीखाली ही मूर्ती प्रस्थापित केलेली आहे. त्यासाठी तीन
जिने उतरून आपल्याला तिथे जावे लागते. ही गणेशमूर्ती दक्षिणाभिमुख आहे. |
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
॥गणपती बाप्पा मोरया ॥
॥मंगलमूर्ती मोरया ॥
🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺 🌺
गणेश- छायाचित्रे : गुगल
फुले - छायाचित्रे : ज्योती घरोटे
No comments:
Post a Comment