‘व्यवहाराचा वेग वाढवणं आणि त्याला अधिकाधिक
सोपं करणं म्हणजे जग पुढे गेलंय असं होत नाही.’ माझ्या
ह्या शेऱ्याने डॉ.पाठक माझ्याकडे जरा आश्चर्याने पाहू लागले. World
Economics Forum च्या India Chapter चे ते प्रमुख
वक्ते होते. ते सरकारच्या सल्लागार समितीवर -Government
Advisory Board वर कित्येक वर्षं काम करत होते. त्यांचं व्याख्यान नुकतंच संपलं होतं आणि आम्ही मधल्या वेळेत लॉबीत कॉफी घेतल्यावर
चर्चा करत होतो.
‘Block chain and crypto currency is the
future... आपण जर वेळीच त्याला अंगिकारलं नाही तर आपण मागे राहू.’
ते जरा कडक सुरातच म्हणाले
‘तुम्हाला वाटतं आपण सगळे पुढे जाऊ?’
‘ऑफकोर्स!
नवीन तंत्रज्ञानच आपल्याला पुढे नेईल.’
‘आपल्याला म्हणजे नक्की कोणाला? काही मूठभर लोकांना, ज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान आत्मसात करायची कुवत आहे, त्यांना? साधारण चारपाच वर्षांपूर्वी ऑनलाईन बँकिंग सगळीकडे
उपलब्ध झालं.त्यानंतर मोबाईल वॉलेट्स आले. पण या सोयी किती जणांना वापरता येतात ह्याचा अहवाल कुठे आहे? पंचाहत्तर, ऐंशी, पंचाऐंशी वर्षांची
माणसं, आधार जोडणी करण्यासाठी धावपळ करतायत. त्यांचे निवृत्ती वेतन मिळायला वेळ लागतोय. अशा वेळी कुणी
कुणाला आधार द्यायचा?’
पाठक मला अजिबात न थांबवता ऐकत होते.
‘सर, प्रत्येक
योजनेचा जसा फायदा कोणाला होतो हे आपण झटकन ओळखतो तसंच त्याचा परिणाम कुठल्या वर्गावर
होईल हे ही तेव्हाच ओळखून त्यावर जर तोडगा काढला गेला तरच आपण सगळे पुढे जाऊ. Selective
progress is harmful Sir! It breeds big gap in the society.’ मी त्यांच्या
भाषेत सांगायचा प्रयत्न केला.
‘मला तुमचा मुद्दा समजला, पुढच्या महिन्यात मी ह्या गोष्टींवर विचार करून त्या संदर्भात काही तोडगा सुचवेन…’
‘आता निश्चितच सगळे पुढे जाऊ सर’
ही कॉन्फरन्स
अटेंड करण्यामागचा माझा हेतू पूर्ण झाला होता. नव्या विचारांचे
बीज पेरले गेले होते.
मानस
No comments:
Post a Comment