“काही
क्षणात तेल सरणार,
थोड्या
वेळात आपण विझणार!
आपलं
आयुष्य संपणार"
हे
प्रकाशज्योतीला ज्ञात असतं!
तरीही
तेलाच्या ओल्या दुःखात,
स्वतःला
आकंठ बुडवीत;
तेवत
रहाते सतत!
पावित्र्य ,मांगल्याचा
उदात्त, धीरगंभीर, शांत
प्रकाश
आनंदाने पसरत!!
अखेर
विझताना ती भासते
अधिक
प्रखर, प्रभावी!
दैदिप्यमान, तेजस्वी!!
जीवनातील
आनंदाचा
जाज्वल्य
अभिमान,
अन्
परोपकाराचे भान
तिच्यामधून ओसंडत असते!!
क्षणभंगूर
जीवन,सुंदर जगण्याचा,
सकारात्मक
संदेश
सर्व
जगाला देणारी!
शुभं
करोति मधून
संस्कार
करणारी!
ही
प्रकाशज्योती
No comments:
Post a Comment