स्नेहा, सीमा कट्टा एकदम छान झालाय.
भारतीचे कझाकस्तान वर्णन खूप सुंदर!! तिकडे जाऊन आल्यासारखं वाटलं वाचताना.
रत्ना ताईंचा अनुभव, दुसरे महायुद्ध, कोबीची भाजी, सीमाचे फोटो आणि चारोळ्या छानच !!
मधले पण स्नेहा स्पेशल !!
एकदम मस्त वाटलं वाचताना
धन्यवाद स्नेहा, सीमा !!
ज्योती कुलकर्णी
******************************************************************
भारती कट्ट्यामधला प्रवास वर्णनाचा लेख वाचला. अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहेस.
ज्योती तुझ्या लेखातून नवीन कन्नड संतांची माहिती मिळाली
फोटो फिचर चारोळ्या मस्त!!
नेहेमी प्रमाणे याही वेळचा कट्टा उत्कृष्ट !!
नीना वैशंपायन
******************************************************************
कट्टा नेहेमीप्रमाणे वाचनीय आणि ऑन टाईम !!
भारती कझाकिस्तानची छान सफर घडवून आणलीस.
ज्योतीचा लेख आणि गाणे छान!!
स्नेहाचे मधले पानही छान!!
मनोरमा जोशी
********************************************************************
भारतीचे कझाकस्तान वर्णन खूप सुंदर!! तिकडे जाऊन आल्यासारखं वाटलं वाचताना.
रत्ना ताईंचा अनुभव, दुसरे महायुद्ध, कोबीची भाजी, सीमाचे फोटो आणि चारोळ्या छानच !!
मधले पण स्नेहा स्पेशल !!
एकदम मस्त वाटलं वाचताना
धन्यवाद स्नेहा, सीमा !!
ज्योती कुलकर्णी
******************************************************************
भारती कट्ट्यामधला प्रवास वर्णनाचा लेख वाचला. अतिशय उत्कृष्ट वर्णन केले आहेस.
ज्योती तुझ्या लेखातून नवीन कन्नड संतांची माहिती मिळाली
फोटो फिचर चारोळ्या मस्त!!
नेहेमी प्रमाणे याही वेळचा कट्टा उत्कृष्ट !!
नीना वैशंपायन
******************************************************************
कट्टा नेहेमीप्रमाणे वाचनीय आणि ऑन टाईम !!
भारती कझाकिस्तानची छान सफर घडवून आणलीस.
ज्योतीचा लेख आणि गाणे छान!!
स्नेहाचे मधले पानही छान!!
मनोरमा जोशी
********************************************************************
काल फुरसतीत कट्टा वाचला. छानच झाला आहे. वेगवेगळे विषयांवर लिखाण आहे.
ज्योतीचा लेख आणि presentation मस्त. समुपदेशन छान. पुर्वा
अनुभवी आहेच. सीमा तुझी आणि सासुबाईंची जोडी छान जमली आहे.
आमच्या भजनात पुर्वी येणार्या
भोरे काकुंचा अनुभव पुन्हा आठवण करुन देतो कि देव दिसत नसला तरी कुणाच्या तरी रुपात
येऊन मदत करतो.
अंगोला पाककृती मस्त.
कानडेंची त्या स्थानाविषयीची
एतिहासिक माहिती सुंदर.
रुपा आणि स्नेहा नेहमी प्रमाणे
छानच.
भारती सप्रे
******************************************************************
कट्टा मस्त!! ज्योतीने दिलेली
कन्नड कबीरांची माहीती खूपच नवीन. भारती खूप छान लिहीते हे कळलंच आहे. कझाकस्तान
लेख छान !
सीमा
व सासूबाईंचं collaboration wonderful क्या बात है!! सीमा
मधले गुण आता प्रगट झाले.
पूर्वा रानडे समुपदेशन छान .
पालकत्व जास्त आवडला.
लिहीण्याची style ही मस्तच आहे.
माझा अहवाल ठीकठाक. स्नेहा नेहमी
प्रमाणे माहीती देणारा.
रूपा भदे
********************************************************************
काल रात्री निवांत बसून कट्टा
वाचला. भारतीचा कझाकस्थान वरचा लेख अप्रतिम! प्रत्यक्ष अल्माटी ला जाऊन आल्याचा feel आला. प्रवास वर्णन कसे असावे याच उत्तम उदाहरणं हा लेख आहे
आणि प्रवासाला गेल्या वर कसं सगळं नीट पहावं याचीही insight मिळाली.
भारती, तू अजून अस लिहीत जा..
ज्योती चा कन्नड कबीर वरचा लेख
वाचला.हा खरंच खूप सुंदर उपक्रम आहे. अनेक अज्ञात संतांची माहिति मिळते. भक्ती
गीतं सुंदर गोड आणि सुश्राव्य झालं आहे. जीवनाला तानपुऱ्याची दिलेली उपमा फारच
सुंदर आणि ज्योतीने छान शब्दात याची उकल करून audio मध्ये सांगितली आहे, खूप कौतुक वाटलं.
मानसी नाईक च घर मनात घर करणार
आहे. आपल ही असं मागे पुढे अंगण असणार अगदी साधं घर असावं असं वाटायला लावणार
मानस ची प्रगती ही अगदी छोटीशीच
कथा एक विचारबीज पेरून तिथेच थांबते..i like his
writing, its different.
प्रीतीचा चा पालकत्वा वरचा उत्सवप्रिय की माणूसप्रिय हा लेख आवडला .. विचार प्रवण आहे..सणावारांचे साजरीकरण मुलांवर थोपू
नये.ते सहज संस्काराने झाले तर अधिक उत्तम नाहीतर त्यांच्या आवडी निवडी
विचारसरणीचा मान राखावा हा अगदी उत्तम बोध या लेखातून मिळतो .
समुपदेशन हे Dr. पूर्वा याचे सदर फार उपयोगी आहे. गोष्टी रूपात हा विषय लेखिका
प्रत्येक वेळीं छान मांडते.
विलायती खाऊ हे सदर मी फार उत्सुकतेने वाचते. लेखकाची creativity
फार आवडते.. मी try करून पाहणार आहे अंगोला type
कोबी.
चित्र चारोळ्या छान, फुलांचे फोटो आणि त्याला अनुरूप कविता मस्त जमून आल्या आहेत,
प्रियांका ची रांगोळी अप्रतिम
आणि रुपालीचा भोंडल्या वरचा लेखही माहितीपूर्ण.
मधल पानही मला आवडतं करण one shot महत्वाच्या घडामोडींच update मिळत.
कट्टा फार मॉडर्न आणि सुबक
आहे..वाचायला 20-25 min लागतात
पण i can understand how much time and efforts must be going into it.
Really appreciate the effort and passion of katta team.
अलका देशपांडे
*************************************************************
कट्टा बद्दल प्रतिक्रिया
द्यायला उशीर झाला त्याला कारण पण तसच आहे, इतका सखोल
विचार करून सगळ्यांनी लेख ,कविता, चारोळ्या
आणि बाकी पण माहिती आहे. त्याला साधा कट्टा छान झाला येवढ्या अभिप्रायने समाधान
होणार नव्हते.
भारती kazakistan हे नावानीच माहीत होते , पण
किती तू सुंदर अभ्यास करून सरळ सुंदर भाषेत वर्णन केलंय. तिथल्या खास महिलांचे
निरीक्षण जर तू केलं असेल तर त्या काय पेहराव घालतात,
त्यांचे राहणीमान कसे आहे ,त्यांना आपल्या
सारखं मुक्त जीवन आहे का हे सगळे वाचायला आवडेल. बघ
पुढल्या कट्ट्यात जमलं तर.
रूपाचा अहवाल, ज्योती चे कर्नाटकातील कबिराचे नामसंकीर्तन खूप माहितीपूर्ण.
माझा आवडता विषय मानसशास्त्र
आणि त्यातील पूर्वाचे समुपदेशन आणि त्याचे महत्त्व आणि गरज सहज सरळ सोपे करून
सांगितले आहे.
चारोळ्या आणि त्यासोबतच चित्रं
अगदी योग्य.
मानसी चे घर मला माझ्या
माहेरच्या घराची आठवण देऊन गेले.
मधले पान आणि सर्व विषयांची
मांडणी कट्टा चे कार्यकर्ते इतके सुंदर करतात ,त्यांचे कौतुक
करावे ते थोडे. या मागे खूप मेहनत असते याचा मला अनुभव आहे कारण आम्ही आमच्या
शाळेचा पण दरमहा newsletter काढतो तर ही प्रक्रिया माहीत
आहे. Links कशा attach करायच्या
हे मला शिकायचं आहे.
एकंदरीत सुंदर कट्टा
रचल्याबद्दल अभिनंदन. असेच लिहित रहा. अभिप्राय जरी दिला नाही तरी वाचत असते मी
आणि माझ्या मैत्रीणीना पण पाठवते. 🏻🏻🏻🏻🏻🏻
नेहा कुलकर्णी
No comments:
Post a Comment