प्रतिसाद डिसेंबर कट्टा

या वेळचा कट्टा मस्त ग. या वेळेस खूप साऱ्या सुरेख कविता आहेत.  आमच्या वेळची दिवाळी,किल्ला या गोष्टी लहानपणीच्या दिवाळीची आठवण देवून गेल्या.फोटो सुद्धा अप्रतिम आहेत👌👌

तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन🙏🙏

वर्षा डेगवेकर 
**************************************

मित्रमंडळ कट्टा चा अंक छान आहे. त्यातील सुखाचा मूलमंत्र ही कथा विशेष भावली. तसेच फोटो फिचर मधील फोटो पाहून छान वाटले. सगळे फोटो सुंदर आहेत. नव्याने सुरू केलेले शब्दकोडे सोडवायला खूप मजा येते. यावेळी ही शब्दकोडे मी व माझ्या वडिलांनी असे दोघांनी ही सोडवले आहे. 

स्वाती पाठक 
**************************************

कट्टा टीम 🙏🏻
डिसेंबर कट्टा परिपूर्ण आहे .
अनोखा गृहप्रवेश खूप छान . दिवेकर बेकरी लेख मला कराडला , माझ्या बालपणात घेऊन गेला. आम्ही सोमवार पेठेतच रहात होतो. शाळा- कॉलेजला जायचा रस्ता बेकरीवरूनच जायचा. लेख छान लिहीलाय . बाकी लेख,कविता पण छान 
टोणगावकर आणि संगमनेरकर दांपत्यांची नर्मदा परिक्रमा मुलाखत आणि द्रविडकाकूंची मुलाखत म्हणजे दुधात साखर! यांच्याकडून खूप शिकण्यासारखं आहे .
पानगळीचे रंग सुंदर आणि वसंत देसाईंची माहिती व गाणं छान . अलकाचा गीताई लेख आणि आकाशझेप छान. 
एकूणच कट्टा  लेख, कविता, संगीत , अध्यात्म , विज्ञान अशा सर्व अंगांनी परिपूर्ण ...👍👍

ज्योती कुलकर्णी 

No comments:

Post a Comment