प्रतिसाद कट्टा जून २०२०


अंक छान झालाय. मागचा अंक ही सुंदर झालेला...
पालकत्वावरील आणि उल्का कुलकर्णी ह्यांचा लेख विशेष आवडला.

अनुजा सामंत
***************************************************

लिहिण्याचा आनंद असतोच. त्यात आपल्या भावना कुणाला भावल्या तर विशेष आनंद मिळतो .त्यासाठी एक platform उपलब्ध करून देणे, प्रतिक्रिया लेखकापर्यंत पोहोचवणं यासाठी तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद🙏

उल्का कुलकर्णी  
***********************************************

ह्यावेळचं मुखपृष्ठ  👌 
शब्दांच्या पलीकडले एक वेगळा अनुभव सुंदर लिहीला आहे.
ज्योतीने लिहीलेला नरहरी सोनार लेख खूप छान! गोष्ट जरी माहीत होती तरी समग्र माहिती वाचायला मिळाली. 'करके तो देखो' मधे लेखिकेने पहिल्या भागांत म्हंटलेलं आपल्यातल्या बऱ्याच  जणांना म्हणजे मध्यम वर्गियांना लागू पडतं. तिचे विचार पटण्यासारखे. पॅरेंटींग वगैरे चोचले हातावर पोट असणाऱ्यांसाठी  नाहीत. 
आता घडत असलेल्या भारतातल्या गोष्टींचा विचार केला तर लाॅकडाऊन मुळे मध्यमवर्ग व श्रीमंत वर्ग protected राहीला. पॅरेंटींग, मानसिक स्वास्थ्य वगैरे गोष्टींचा उहापोह केवळ तेवढ्यांसाठीच असतो.
नेपाळी दम आलू बद्दल मी साशंक आहे. मसाला बिसाला काहीच नाही. ☺
पूर्वा रानडेंचा ‘तणाव आणि मी लेख’ खूपच चांगला लिहीलाय. त्यांतच add करून मी म्हणेन 
स्पर्धा, bad attitude, दूसर्याला कमी लेखणे, अनुल्लेखाने मारणे वगैरे ही तणाव आणू शकतात. फोटोफीचर खरोखर अप्रतिम 👌👌

रुपा भदे
************************************************

कट्टा मस्त आणि ऑन टाईम  .👏🏻👏🏻 तळ्यांचे शहर किती छान आणि डिटेल माहिती . Will be looking forward for more info about other lakes in bangalore.   
आठवणीतला साखर आंबा मस्त . 
अलकाची गीताई साधी सोपी करून आहे नेहमी प्रमाणे  
 फोटो फिचर पण छान . 👌
ज्योती लेख छान 👍🏻

वैशाली नाडगीर
**************************************************

अभ्यासपूर्वक लिहिलेला अनिरुद्ध अभ्यंकर यांचा 'तळ्याचे शहर ' हा लेख माहितीपूर्ण आहे. निसर्गनिर्मित तळे नव्हे तर शेकडो वर्षांपूर्वी माणसांनी बांधलेले तळे, हे स्थापत्यशास्त्रामध्ये अभ्यासाचा विषय ठरावा असे. 
'आठवणींतला साखरआंबा ' मला माझ्या आजोळी कोंकणात घेऊन गेला. कुठलाही चष्मा न लावता, बातमी देणाऱ्याने, लोकांपर्यंत माहिती कशी पोहोचवायची, हा पत्रकारितेचा उत्कृष्ठ नमुना म्हणजे स्नेहाचे 'मधले पान'. प्रत्येक महिन्यामध्ये तिने ते सातत्याने टिकविले आहे. अलकाने कर्मसंन्यास योग  सोप्या पद्धतीने विशद करून सांगितला आहे. ज्योतीने संतमंडळींची ओळख करून द्यायचा जो वसा घेतला आहे, त्यामुळे दर मासागणिक नवीन माहितीची भर पडत आहे. कट्ट्यामधले ललितलेख, कविता, समुपदेशन , पालकत्व , दुसऱ्या महायुद्धातले  किस्से वाचनीय आहेत. कट्ट्याला मनःपूर्वक शुभेच्छा!

रुपाली गोखले 
************************************************

स्नेहा जून कट्टा मस्त, तळ्यांचे शहर, शब्दांच्या पलीकडे हे माझ्या आवडत्या विषयांचे लेख छान आहेत. तुझे मधले पान ही माहितीपूर्ण. 
नाम संकीर्तन -नरहरि सोनार - मधला अभंग छान आहे. 
कट्टा टीमचे अभिनंदन आणि पुढील प्रकाशनार्थ अनेक शुभेच्छा 🙏
अस्मिता ओक

No comments:

Post a Comment