प्रतिसाद मार्च २०२०

ज्योतीचा कान्होपात्रा लेख छान झाला आहे. माहिती नसलेल्या साकम्मां वरचा लेख चांगला. श्रुति ने छान भाषांतर केलय. भारतीचं पुस्तक परीक्षण उत्तम. 
फेमिनिझमचा खरा अर्थ कळतो. खूप complex विषय आहे. भारती चांगलच अभ्यासपूर्ण लिहीते. 
वरूण चं फोटो फीचर काबिले तारीफ शिवाजीमहाराजांवरची कविता का म्हणून छोटी पण छान लिहीली आहे. समर्पक
स्नेहा ह्या वेळेचं मधलं पान तू भरपूर कव्हर केलस. ह्या महिन्यात शेवट पर्यंत इतक्या गोष्टी घडत राहिल्या. त्या सगळ्या साक्षेपाने इथे वाचायला मिळाल्या. 
किस्सा ड्रेस्डेनचा -युद्धस्य कथा रम्या नसतात हे जर्मनी देशाकडे पाहीलं की कळून येतं. सर्व बेचिराख नी पुनरबांधणी झालेला देश. त्यांनी खूप सोललं आहे. 
नवीन शिकवलेली डीश म्हणजे वांग्याचे भरीत. कृती वेगळी. पण end result तोच असावा असं वाटलं. मस्त चवदार !! 
माझं नाट्य परीक्षण उमेश कामत पर्यंत जाईल का
नाहीतर मी तोंडपुस्तकावर (Facebook),भरवीन  उलटं (feed back) 
सीमा , स्नेहा , भारती विशेष आभार!! 
बाकीचं अजून वाचलं नाही. 
कट्टा खूप चांगला होतो आहे!!
नेहा/रुपा भदे
**************************************************

कट्टा खूप सुंदर ! ज्योतीचा कान्होपात्रा वरचा लेख आणि अभंग खूप छान ! माहिती नसलेली बरीच छान माहिती या लेख मालेतून मिळते. रत्ना ताईंचा इकिगाई खूप आवडला.. मागच्या महिन्याचा part 1 वाचायचा राहिला.. पण तो आता लगेचच वाचणार आहे. शिवरायांचा आठवावा साक्षेप... perfect विश्लेषण.. खूप आवडला हा लेख मला. मधल पान नेहमी प्रमाणे सम्यक पत्रकारितेची झलक देणार.  विलायती खाऊ लिहिणारे great आहेत.. त्यांचं  बारकाईच निरीक्षण मला नेहमीच चकित करतं. रूपाच दादा एक गुड न्युज आहे नाटकाचं परीक्षण एकदम professional.. थोडक्या शब्दात परफेक्ट लिहिलय.. खरं तर नाटक पहिल्या वर मी net वर अनेक परीक्षण वाचली होती but none of them were so perfect.

श्रुती आणि भारतीचे लेख आवडले हे नमूद करायचे राहून गेले. सक्कमांची गोष्ट प्रेरणादायी आहे. चिममंडा चे विचार नेहमी पेक्षा वेगळे वाटले.. would like to know more about her.
Overall good Sunday treat... कट्टा शनिवार रविवारी आला की लगेच वाचला जातो.. ताजा ताजा..
अलका देशपांडे
***************************************************** 

रत्नाचा इकीगाई लेख, श्रुती ने लिहिलेली कॉफी बद्दलची माहिती, ज्योतीची कान्होपात्रा,तसेच शिवरायांवरील लेख.....छानच...एकूणच कट्टा टीमचे अभिनंदन!!👏🏻👏🏻👍🏻
प्रीती वणीकर
********************************************************

कट्टा टीम चे अभिनंदन, वाचनीय लेख, नीना चे मुखपृष्ठ सुंदर च. मला स्त्री, किर्लोस्कर किंवा मिळून साऱ्याजणी ही मासिक वाचायला आवडायची कारण त्यात generally माहितीपर लेख असायचे, त्याचं धर्तीवर कट्टा चे लेखही वाचनीय आणि माहितीपर असतात. त्यात महत्वाचे म्हणजे संपादकीय मंडळी माझ्या ओळखीची आहेत याचा खूप आनंद आणि काही लेखक आणि आर्टिस्ट ही,  keep it up katta team. Sneha तुझ्यात संपादनाचे potential होतेच आणि ते उत्तम पणे निभवत आहेस.  येणाऱ्या महिला दिनाच्या ही सर्वांना शुभेच्छा.
सीमा बोंगाळे
*********************************************************
कट्टा टीमला धन्यवाद त्यांचे अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा. धन्यवाद असा दर्जेदार अंक दर महिन्याला आम्हाला वाचायला मिळतो म्हणून. अभिनंदन अशासाठी की आपल्या माहितीच्या आणि जवळच्या कलाकारांनी केलेली कलाकृती अनुभवायला मिळाल्यामुळे जास्त आनंद आणि आपुलकी वाटते. शुभेच्छा अशासाठी की असाच कायम आम्हाला आनंद देत राहा. विविधाच्या  कलाकार संख्यांचे असेच दर्जेदार योगदान घडत राहो.
मनोरमा जोशी.
**********************************************************
सुप्रभात 
स्नेहा, सीमाभारती कट्टा एकदम मस्त..👌🏻👌🏻
अलका चा गीताई लेख, रत्ना चं इकिगाईश्रृति चा काॅफी आणि साकम्मांचा लेख खूपच सुंदर... 
भारतीचा चिम्मंडांवरचा लेख वेगळा आणि विचार करायला लावणारा आहे... 
बाकीचे नेहमीचे लेख पण नेहमीप्रमाणे छानच... 
शिवाजी महाराजांवरील  लेखन 
उत्तम... 🙏🏻
नीनाचं चित्र खूप सुंदर... 
एकूण कट्टा सर्वतोपरी वाचनीय झाला आहे.
US फोटोज मस्त...👌🏻👌🏻
सर्व कट्टा टीम ला धन्यवाद...🙏🏻🙏🏻
स्नेहाला ' मधले पान' साठी विशेष धन्यवाद.
ज्योती कुलकर्णी
******************************************************** 

शिवरायांचा आठवावा साक्षेप... या लेखात , सामान्य माणसांना स्वराज्याच्या कामात जोडणे , त्यांना प्रशिक्षित करणें  , त्यांना stream  मध्ये आणून स्वराज्य समृध्द करणे ,विस्तारणे हे महाराजांचे पैलू लेखात छान  स्पष्ट केले आहेत. राजांचे सैनिकी  व प्रशासकीय धोरण किती जबरदस्त होते याची कल्पना येते ....
अधिकार न गाजवता समान न्याय व्यवस्था राबवणे हे सोपे नाही ... याचे वर्णन चांगले मुद्देसूद केले आहे 

"दादा एक गुड न्युज आहे: परिक्षण "या लेखातील ,नाटकातील कलाकारांशी गप्पा व प्रतिक्रिया हे वेगळ्या लिंकवरून देण्याचा प्रयोग फारच आवडला 


गीताई :सांख्य योग- भाग 2 हा अलकाचा  लेख छान आहे 

किस्सा ड्रेस्डेनचा हा लेख खूप माहितीपूर्ण आहे 

नीना चित्र मस्त

सीमा D तुझं खरंच कौतुक आहे...सर्व कट्टा टीम चे खरंच काम कौतुकास्पद आहे....
रत्ना गोखले 

No comments:

Post a Comment